
बॉलिवूडची (Bollywood) 'चांदणी' म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी (Actress Sridevi) यांचे २०१८ मध्ये आकस्मिक निधन झाले. श्रीदेवी यांच्या निधनामुळे फक्त त्यांच्या कुटुंबीयांनाच नाही तर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांच्या मृत्यूवर त्यावेळी कोणालाच विश्वास बसत नव्हता. दुबईमध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले होते.
श्रीदेवी यांचा मृत्यू नेमका कसा झाला होता यावर अद्यापही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. श्रीदेवीच्या मृत्यूला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता तिचे पती बोनी कपूरने तब्बल ५ वर्षांनंतर श्रीदेवीच्या मृत्यू प्रकरणावर मौन सोडले आहे. त्यारात्री नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे. जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
'द न्यू इंडियन'ला बोनी कपूर यांनी नुकताच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी पत्नी श्रीदेवींच्या मृत्यूबद्दल बोलताना हा मृत्यू नैसर्गिक नसून अपघाती असल्याच सांगितले. बोनी यांनी सांगितले की, 'मी अजूनही श्रीदेवीला खूप मिस करतो. कारण ती आज ते क्षण पाहण्यासाठी नाही जे तिला पाहायचे होते. मुलगी जान्हवी कपूरचे यश, धाकटी मुलगी खुशी कपूरचे बॉलिवूडमध्ये पदार्पण पाहायचे तिचे स्वप्न होते.'
बोनी कपूर यांनी सांगितले की, 'माझे सलग सहा चित्रपट साऊथमध्ये रिलीज झाले आहेत. सर्व हिट झाले आहेत. पण हे यश पाहण्यासाठी श्रीदेवी नाही हे दुखावते. म्हणूनच मी तिचा हा फोटो इथे लावला आहे. जेणे करून असे वाटेल की ती इथेच आहे.'
श्रीदेवीच्या निधनाबाबत बोनी कपूर यांनी सांगितले की, 'श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर तो अपघाती मृत्यू होता. मी याबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला होता कारण माझी चौकशी केली जात असताना मी सुमारे २४ ते ४८ तास याबद्दल बोललो होतो.' यावेळी बोनी यांनी त्यांच्या मौनामागचे कारण उघड केले आहे. ते म्हणाले की, 'त्यांना तपास अधिकाऱ्यांनी तसे करण्यास सांगितले होते. कारण भारतीय मीडियाचा खूप दबाव होता. मी लाय डिटेक्टर चाचणी आणि इतर गोष्टींसह सर्व चाचण्या केल्या. त्यानंतर आलेल्या अहवालातही हा अपघाती मृत्यू असल्याचे म्हटले आहे.'
बोनी कपूर यांनी पुढे श्रीदेवीच्या लाइफस्टाइलबद्दल सांगितले, 'तिला चांगले दिसायचे असल्यामुळे ती अनेकदा उपाशी राहत होती. माझ्याशी लग्न झाल्यापासून तिला काही वेळा ब्लॅकआऊट झाला आणि डॉक्टरांनी सांगितले होते की तिला कमी रक्तदाबाचा त्रास आहे. श्रीदेवी रात्रीचे जेवण मीठाशिवाय खायची. तिला डॉक्टरांनी सांगितले होते की कमी रक्तदाबाचा त्रास आहे तर मीठ खा. सॅलाडवर थोडंसं मीठ टाकून खा पण ती कोणाचे ऐकत नव्हती. तिने हे गांभीर्याने घेतलं नाही.'
बोनी कपूर यांनी पुढे असेही सांगितले की, 'जेव्हा त्यांचे सह-अभिनेते नागार्जुन श्रीदेवीच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते. तेव्हा नागार्जुनने मला सांगितले होते की, तिच्या एका चित्रपटादरम्यान ती पुन्हा क्रॅश डाएटवर होती आणि त्यावेळी ती बाथरूममध्ये पडली आणि तिचे दात तुटले होते. कदाचित ते नशिबी आले असावे. दुर्दैवाने, तिने ते गांभीर्याने घेतले नाही आणि ही घटना इतकी गंभीर होऊ शकते असे कधीच वाटले नव्हते.'
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.