Apurva Nemlekar Post: 'मी ती Trophy जिंकली नाही पण...' लेडी ऑफ वर्ड अपूर्वा नेमळेकरने 'बिग बॉस'च्या आठवणी केल्या शेअर

Apurva Nemlekar: अपूर्वा नेमळेकर सध्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Apurva Nemlekar Post
Apurva Nemlekar PostInstagram/ @apurvanemlekarofficial

Apurva Nemlekar On Bigg Boss Marathi 4:

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. 'बिग बॉस मराठी ४'मध्ये अपूर्वा सहभागी झाली होती. 'बिग बॉस'चे पर्व गेल्या वर्षी याच दिवशी सुरू झाले होते. यानिमित्त अपूर्वा नेमळेकरने पोस्ट केली आहे.

अपूर्वा नेमळेकरने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये बिग बॉसमधील स्पर्धकांचे रियुनियन झाल्याचे दिसत होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपतीनिमित्त देखील हे स्पर्धक एकत्र आले होते.

अपूर्वा नेमळेकरची पोस्ट

'बिग बॉस मराठी ४'च्या पर्वाला एक वर्ष पुर्ण झाल्याने अपूर्वा नेमळेकरने पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अपूर्वाने लिहिले आहे की, 'गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे 2 October ला Bigg Boss Marathi Season 4 सुरू झाले होते आणि मला Bigg Boss मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.

Apurva Nemlekar Post
Akshay Kumar Movie: देशाच्या पहिल्या हवाई हल्ल्याचा थरार रूपेरी पडद्यावर: अक्षय कुमारच्या 'Sky Force'ची रिलीज डेट जाहीर

तसे पाहता Bigg Boss मध्ये 100 दिवस टिकून राहणं म्हणजे एक मोठा खडतर दिव्यप्रवास असतो. मात्र या शंभर दिवसात मला माझ्यामधली मी जशी आहे तशी आणि माझा मुळ स्वभाव जसा आहे तसा प्रेक्षकांना पाहता आला. यापूर्वी अनेक सीरियल, नाटक, फिल्मद्वारे वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर माझा अभिनय सादर केला. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद ही दिला.

तथापि Bigg Boss एक असा कार्यक्रम आहे. तिथं आपल्याला अभिनय करता येतं नाही. त्यामध्ये तुम्ही original जसे आहात तसेच प्रेक्षकांना दिसता. जे अभिनय करतात किंवा खोटं खोटं वागण्याच्या प्रयत्न करतात ते लवकरच घराबाहेर जातात. मी Bigg Boss मध्ये जाण्यापूर्वी कोणतीही strategy ठरवली नव्हती. मी माझे मन, मनगट, आणि मेंदू या 3M तत्त्वाचा वापर केला.

यापूर्वी मी जे character केलं होतं तशीच मी प्रेक्षकांना वाटले. पणं माझ्या मुळ स्वभावानुसार मला खोटं वागता येत नाही, खोटं बोलता नाही. मी स्वतःचा स्वाभिमान खूप जपते. त्यामुळे मी जे बोलते तेच करते आणि तशीच वागते आणि त्यामुळेच मी 100 दिवस टिकले आणि म्हणूनच Bigg Boss नी मला ''LADY OF WORDS" हा किताब दिला.

Bigg Boss च्या प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव आले. चेहऱ्यावर हसू आणून खोटी स्तुती करणारे मित्र भेटले आणि आयुष्यभर जिवापाड जीव लावणारे मित्र, मैत्रिणी सुध्दा भेटल्या. हार जीत तर प्रत्येक ठिकाणी असतेच. भले मी ती Trophy जिंकली नाही. पण करोडो प्रेक्षकांची मने मात्र नक्कीच जिंकली..!!

मला ही संधी दिल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते...! तुम्ही सर्वांनी मला उंच उडायला पंख दिले.'

अपूर्वाने ही पोस्ट शेअर करत तिच्या 'बिग बॉस'मधील प्रवासाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर अभिनेत्री तेजश्री प्रधान, राखी सावंत, मेघा घाडगे यांनी कमेंट केल्या आहेत. तसेच नेटकरी देखील कमेंट करत अपूर्वाचे कौतुक करत आहेत.

अपूर्वा नेमळेकर सध्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अपूर्वा खलनायिकेची भूमिका साकारत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com