Lok Sabha Election Results On Sunil Lahri Saam TV
मनोरंजन बातम्या

Ayodhya Election Result: अयोध्या नगरीत भाजप पराभूत, समाजवादी पक्ष विजयी, ‘रामायण’मधील लक्ष्मण नाराज, म्हणाले...

Sunil Lahri on Lok Sabha Election Results: अयोध्येमध्येही भाजपला पराभवाला सामोरे जावं लागलं. अशातच निवडणुकीत अयोध्येतील नागरिकांनी भाजपाला मत न दिल्याबद्दल अभिनेते सुनील लहरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Chetan Bodke

रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेमध्ये लक्ष्मण भूमिका साकारून अभिनेते सुनील लहरी लोकप्रिय झाले. लोकसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये उत्तरप्रदेशात भाजपला म्हणावे तितके मत मिळाले नाही. उत्तर प्रदेशमधील फैजाबाद लोकसभा मतदारसंघात अयोध्या नगरीचा समावेश होतो. अयोध्येमध्येही भाजपला पराभवाला सामोरे जावं लागलं. अशातच निवडणुकीत अयोध्येतील नागरिकांनी भाजपाला मत न दिल्याबद्दल अभिनेते सुनील लहरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सुनील यांनी इन्स्टा स्टोरी शेअर करत फैजाबाद मतदारसंघातील निकालाबद्दल अयोध्येतील मतदारांवर टीका केली आहे. शेअर केलेल्या इन्स्ट स्टोरीमध्ये, सुनील यांनी बाहुबली चित्रपटातील एक सीन शेअर केलेला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, " आपण विसरलो आहोत की हे तेच अयोध्यावासी आहेत, ज्यांनी सीतामाता वनवासातून पुन्हा परतल्यानंतर त्यांच्यावर संशय घेतला होता. देवालाही नाकारणाऱ्या माणसाला काय म्हणायचे? स्वार्थी. अयोध्येतील नागरिकांनी आपल्या खऱ्या राजाचा नेहमीच विश्वासघात केला याचा पुरावा इतिहासातही आहे." असं सुनील लहरींनी पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Sunil Lahari Post

दुसऱ्या इन्स्टा स्टोरीमध्ये त्यांनी लिहिलं, "अयोध्येतील लोकांनो, आम्ही तुमच्या महानतेला सलाम करतो, तुम्ही तेच लोकं आहात ज्यांनी देवी सीतेलाही सोडलं नाही. मग प्रभू रामांना त्या छोट्या टेंटमधून एका सुंदर मंदिरात विराजमान करणाऱ्यांचा विश्वासघात करणं तुमच्यासाठी मोठी गोष्ट नाही. संपूर्ण भारत देश तुमच्याकडे पुन्हा कधीही आदराने पाहणार नाही." असं त्यांनी आपल्या स्टोरीमध्ये लिहिले. अयोध्या लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद विजयी झाले आहेत. तर भाजपाचे लल्लू सिंह यांचा मोठा पराभव झाला आहे. उत्तरप्रदेशामध्ये एकूण ८० लोकसभेच्या जागा आहेत. त्यापैकी भाजपने फक्त ३३ जागा जिंकले आहे.

Sunil Lahari Instagram Story

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT