साऊथ अभिनेता राम चरणचा (Ram Charan ) 'गेम चेंजर' (Game Changer ) चित्रपट 10 जानेवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'गेम चेंजर' हा चित्रपट एस. शंकर दिग्दर्शित आहे. 'गेम चेंजर' चित्रपट बनवण्यासाठी तब्बल तीन वर्ष लागली आहेत. हा चित्रपट 450 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. 'गेम चेंजर' चित्रपटात ॲक्शन-ड्रामा अन् रोमान्सचा धमाका पाहायला मिळत आहे.
'गेम चेंजर' हा चित्रपट आता ओटीटीवर (OTT Release) पाहता येणार आहे. 'गेम चेंजर'चित्रपटाचे ओटीटी राइट्स अॅमेझॉन प्राइमने विकत घेतले आहे. या ओटीटी राइट्सची किंमत 105 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट रिलीजच्या दोन ते तीन महिन्यानंतर ओटीटीवर पाहाता येणार आहे. मात्र अद्यापही चित्रपटाच्या ओटीटी रिलीज तारखेची अधिकृत घोषणा झाली नाही आहे.
साऊथ अभिनेता राम चरण ( Ram Charan) याचा 'गेम चेंजर'चित्रपटाने मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 51.25 कोटी रुपये कमावले आहेत. तर दुसऱ्या दिवशी 21.5 कोटींची कमाई आहे. 'गेम चेंजर' अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाने एकूण 72.5 कोटी रुपये कमावले आहेत. 'गेम चेंजर' चित्रपट तेलुगु, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळ या पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे.
'गेम चेंजर' चित्रपटात राम चरणसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालत आहे. 'गेम चेंजर' मध्ये राजकीय पार्श्वभूमी आहे. या चित्रपटात राम चरणने आयएएस अधिकाऱ्याची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची गाणी सुपरहिट ठरली आहे. हा चित्रपट भविष्यात किती कोटींची कमाई करणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.