Shrutika Arjun : बिग बॉसच्या घराबाहेर पडताच श्रुतिका अर्जुनने केला मोठा खुलासा, म्हणाली...

Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरातून श्रुतिका अर्जुनचा पत्ता कट झाला आहे. घराच्या बाहेर आल्यावर श्रुतिकाने काही गोष्टींचा खुलासा केला आहे. नेमकं ती काय बोली, जाणून घ्या.
Bigg Boss 18
Shrutika ArjunSAAM TV
Published On

'बिग बॉस 18'चा (Bigg Boss 18) गेम आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घरातील सदस्यांची गेम खेळताना तीव्रता देखील वाढली आहे. खेळ शेवटच्या टप्प्यावर येताच घरातील सर्वात स्ट्राँग स्पर्धकाला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. बिग बॉसच्या घरातून श्रुतिका अर्जुन घराबाहेर पडली आहे.

यंदा कमी मते मिळाल्यामुळे श्रुतिकाला (Shrutika Arjun) बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता घराबाहेर पडताच श्रुतिकाने एका मिडिया मुलाखतीत आपल्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. श्रुतिका मुलाखतीत म्हणाली की, "बिग बॉसच्या घराने मला पूर्वीपेक्षा अधिक स्ट्राँग केले आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही एकटीने प्रवास केला नाही. मी माझ्या कुटुंबाशिवाय आणि अर्जुनशिवाय 24 तासही एकटे घालवलेले नव्हते, मात्र येथे आल्यावर हे मी करू शकले. तीन महिने आणि तेही फोन शिवाय मी राहिले. "

श्रुतिकाने पुढे सांगितले की, "मी बिग बॉसच्या घरात दोनदा मानसिकरित्या माझी तब्येत बिघडली होती. कारण मला घरातील सदस्यांची आठवण येऊन अश्रू अनावर झाले होते. मी फिनालेला येऊन घराबाहेर पडले याचा मला कोणताही पश्चात्ताप नाही. मी आनंदी आहे." श्रुतिकाच्या घराबाहेर जाण्यामुळे अनेक सदस्यांना वाईट वाटले.

आता बिग बॉसच्या घरात फक्त आठ सदस्य उरले आहेत. यात अविनाश, चाहत, चुम दारंग, करणवीर, शिल्पा, रजत, विवियन आणि ईशा यांचा समावेश आहे. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार आणि कोण 'बिग बॉस 18' ची ट्रॉफी उचलणार हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. बिग बॉसचा फिनाले 19 जानेवारीला पार पडणार आहे.

Bigg Boss 18
Game Changer Collection : राम चरणच्या 'गेम चेंजर'चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुराळा, कलेक्शनचा आकडा किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com