Game Changer Collection : राम चरणच्या 'गेम चेंजर'चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुराळा, कलेक्शनचा आकडा किती?

Game Changer Box Office Collection Day 1 : राम चरणचा 'गेम चेंजर' चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवसात बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.
Game Changer Box Office Collection Day 1
Game Changer CollectionSAAM TV
Published On

साऊथ स्टार राम चरण याचा 'गेम चेंजर' चित्रपट 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवसात बंपर कमाई केली आहे. या चित्रपटात राम चरणसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील आहे. या चित्रपटातील गाण्यांना तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'गेम चेंजर' (Game Changer) चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती रुपयांची कमाई केली जाणून घेऊयात.

'गेम चेंजर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1

साऊथ अभिनेता राम चरण ( Ram Charan) यांनी पहिल्याच दिवसात बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. 'गेम चेंजर'ची बंपर ओपनिंग झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'गेम चेंजर'चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection Day 1 ) 51.25 कोटी रुपये कमावले आहेत.'गेम चेंजर' या चित्रपटाक भरपूर ॲक्शन आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली आहेत.

'गेम चेंजर' चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. यात तेलुगु, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळ भाषांचा समावेश आहे. 'गेम चेंजर'चित्रपटाने तेलुगु भाषेत सर्वाधिक कमाई केली आहे. तेलुगु 42 कोटी कमावले आहेत. तर तमिळमध्ये 2.1 , हिंदीत 7 कोटी, कन्नडमध्ये 0.1 कोटी आणि मल्याळम भाषेत 0.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत.

'गेम चेंजर' हा चित्रपट एस. शंकर दिग्दर्शित आहे. 'गेम चेंजर'मधील राम चरणच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कियारा अडवाणीच्या (Kiara Advani) अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. भविष्यात हा चित्रपट अनेक मोठ्या सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच 'गेम चेंजर' चित्रपट अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचे रेकॉर्ड देखील ब्रेक करू शकतो.

Game Changer Box Office Collection Day 1
Maha Kumbh 2025 : अमिताभ बच्चन ते पूनम पांडे, बॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी घेतला होता कुंभमेळ्यात सहभाग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com