उत्तर प्रदेश प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जानेवारीला या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यासाठी भारतासह जगभरातून ४० कोटींपेक्षा जास्त लोक येणार असल्याचे म्हटले जात आहे.
सरकारद्वारे महाकुंभ मेळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने तयारी केली जात आहे.
१३ जानेवारी रोजी महाकुंभमधील प्रथम स्नान संपन्न होणार आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटी मंडळीही स्नान करण्यासाठी जमणार आहेत. अमिताभ बच्चन, प्रिती झिंटा अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी यापूर्वीही कुंभ मेळ्यामध्ये स्नान केले आहे.
बिग बी अमिताभ यांनी बच्चन कुंभ मेळ्यात स्नान केले आहे. ते या सोहळ्यात आधी सहभागी झाले होते. यंदाच्या महाकुंभ सोहळ्यालाही ते हजर राहणार असल्याचे म्हटले जात आहे.
बॉलिवूड अभिनेते आणि उद्योजक विवेक ओबेरॉय देखील कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले होते. ते स्वामी चिंदानंद यांच्या आश्रममध्ये दर्शनासाठी आले होते. विवेक व्यतिरिक्त अन्य सेलिब्रिटींनीदेखील आश्रमला भेट दिली होती.
प्रिती झिंटा ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने २०१३ मध्ये कुंभ मेळ्यात स्नान केले होते. तेव्हाही प्रयागराजमध्ये महाकुंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रितीचे मेळ्यातले फोटो व्हायरल झाले होते.
प्रिती झिंटा प्रमाणे शिल्पा शेट्टी देखील २०१३ मध्ये प्रयागराजमध्ये आयोजित कुंभ सोहळ्यात सामील झाली होती. ती अत्यंत धार्मिक स्वभावाची आहे. यंदाही कुंभ मेळ्याला हजर राहू शकते असे म्हटले जात आहे.
Controversy Queen अशी ओळख असलेली राखी सावंत देखील महाकुंभमध्ये स्नान करुन गेली आहे. सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर तिने काही फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.
पूनम पांडेने सुद्धा कुंभ मेळ्यामध्ये स्नान केले आहे. महाकुंभ सोहळ्यात स्नान केल्यानंतर तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.