Raja Shivaji Show Cancel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raja Shivaji Show Cancel: मुंबईतल्या प्रसिद्ध थिएटरमध्ये 'राजा शिवाजी'चा शो अचानक रद्द; प्रेक्षकांचा संताप अनावर

Raja Shivaji Show Cancel: मुंबईतील भारतमाता टॉकीजमध्ये ‘राजा शिवाजी’चा शो अचानक रद्द झाल्याने प्रेक्षक संतप्त झाले. पूर्वसूचना न दिल्याने गोंधळ निर्माण झाला असून व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Shruti Vilas Kadam

Raja Shivaji Show Cancel: रितेश देशमुखचा राजा शिवाजी या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान मुंबईत एक गोंधळाची घटना समोर आली आहे. प्रेक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक शो रद्द करण्यात आल्याने मोठी तारांबळ उडाली. हा प्रकार दादरच्या भारतमाता टॉकीज येथे घडल्याचे समोर आले आहे.

चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने दमदार कामगिरी करत मराठी चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले. त्यामुळे वीकेंडला मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी तिकीट बुकिंग केले होते.

मात्र, शो सुरू होण्याआधीच तो अचानक रद्द करण्यात आला. कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने थिएटरमध्ये उपस्थित प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली. अनेक प्रेक्षक वेळेआधी थिएटरमध्ये हजर होते, पण शो न लागल्याने त्यांचा संताप उफाळून आला. काही प्रेक्षकांनी व्यवस्थापनाकडे स्पष्टीकरण मागितले, मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकारामुळे थिएटरबाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी प्रेक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादही झाले. विशेष म्हणजे, शो रद्द होण्यामागचे कारण स्पष्ट करण्यात आले नसल्याने परिस्थिती आणखी चिघळली. व्यवस्थापकांनीही याबाबत हात वर केल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, अशाच प्रकारची घटना ठाण्यातील एका थिएटरमध्येही घडल्याची माहिती समोर आली आहे. तेथे तांत्रिक अडचणीमुळे शो रद्द करण्यात आल्याने प्रेक्षक नाराज झाले होते.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात रितेश देशमुख सह जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, भाग्यश्री, महेश मांजरेकर यांसारखे कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अस्सल गावरान स्टाईल चिवळीची भाजी कधी खाल्लीये का? एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा| Chivalichi Bhaji Recipe

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT