Raj Kundra Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raj Kundra Video: "माझी एक किडनी तुमच्या नावावर..."; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं वचन, प्रेमानंद महाराज भावुक

Raj Kundra- Premanand Maharaj Viral Video : राज कुंद्राचा प्रेमानंद महाराजांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात राज कुंद्राने त्यांच्यासमोर किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Shreya Maskar

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली.

राज कुंद्राने महाराजांसमोर किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा प्रेमानंद महाराजांच्या भेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतीच शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राने (Raj Kundra) प्रेमानंद महाराजांची भेट घेतली आहे. याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

प्रेमानंद महाराज शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला मार्गदर्शन देताना दिसले. प्रेमानंद महाराजांच्या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात महाराजांसमोर (Premanand Maharaj ) राज कुंद्राने त्याची किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर महाराज काय म्हणाले, जाणून घेऊयात.

राज कुंद्रा नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राज कुंद्रा म्हणतो, "मी तुम्हाला गेल्या 2 वर्षांपासून फॉलो करत आहे. माझ्या मनात जो प्रश्न येतो त्याचे उत्तर दुसऱ्याच दिवशी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमाने मिळाते. आता माझ्याकडे कोणताही प्रश्न नाही. मी फक्त एवढेच बोलेन की, जर मी कधी तुमच्या कामी आलो तर माझी एक किडनी तुमच्या नावे... " हे ऐकताच शिल्पा खूप आश्चर्यचकित झाली.

प्रेमानंद महाराजांची प्रतिक्रिया

राज कुंद्रा यांची किडनी दानाचे ऐकताच प्रेमानंद महाराज म्हणाले," नाही... तुम्ही स्वस्थ आणि प्रसन्न रहा. मी आता ईश्वराच्या कृपेने अत्यंत स्वस्थ आहे. जोवर ईश्वराचे बोलावणे येणार नाही. तोवर किडनी मला घेऊन जाणार नाही." राज कुंद्रा आणि प्रेमानंद महाराजांच्या या संभाषणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती फिटनेस, आपल्या लूकचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. तिच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? खरातचा आणखी एक कारनामा समोर

Ashok Kharat Case: आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरात प्रकरणी चाकणकरांना अटक होणार?

पश्चिम-आशियातील युद्ध थांबणार? इराणनं PM मोदींना सांगितली युद्ध थांबवण्याची अट

जादूटोणाशी आमचा कधी संबंध आला नाही; मंत्री भरत गोगावले असे का म्हणाले?

अमरावतीत चाललंय काय? शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर

SCROLL FOR NEXT