Shilpa Shetty Ed Raids: शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची छापेमारी; पती राज कुंद्रा मोठ्या अडचणीत, नेमकं प्रकरण काय?

Shilpa Shetty Husband Rajkundra Ed Raids: शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील घरी ईडीचे छापे, पोर्नोग्राफी केससंदर्भात ईडीची कारवाई
Shilpa Shetty and Raj Kundra
Shilpa ShettySaam Tv
Published On

बॉलिवूड विश्वातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. नुकतंच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या मुंबईतील घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. पोनोग्राफी अ‍ॅप प्रकरणी ही ईडीची कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ईडीने यापूर्वी देखील शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला ईडीने नोटीस पाठवली होती.

Shilpa Shetty and Raj Kundra
Reshma Shinde Husband: हळद लागली, नवरी सजली; रेश्मा शिंदेच्या नवऱ्याला पाहिलात का?

मोबाईल अॅपद्वारे पोनोग्राफिक कंटेटंची निर्मिती केल्याचा तसेच त्याची वितरण केल्या संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली आहे. शिल्पा शेट्टीचे पतीच्या मुंबईतील जुहू घरासह अनेक ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहे.

शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्राच्या सांताक्रूझ येथील घरी आणि कार्यालयावर ईडीने कारवाई सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राच्या कारवाईनंतर आता अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांसह उत्तर प्रदेशात १५ ठिकाणी ईडीचा तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Shilpa Shetty and Raj Kundra
Sonnalli Seygall Baby: 35 व्या वर्षी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री बनली आई; दिला गोंडस बाळाला जन्म

शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्रावर यापूर्वी देखील ईडीने कारवाई केली होती. २०२१ मध्ये, बिटकॉइन फसवणुकीसंदर्भात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप झाला होता. दरम्यान मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक देखील होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com