Symptoms of kidney failure: किडनी खराब झाल्यावर पायांमध्ये दिसून येणारे 3 मोठे बदल ओळखा; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

Signs of kidney failure in legs: आपल्या शरीरात किडनी हे एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. ती रक्तातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त द्रव बाहेर काढून शरीर स्वच्छ ठेवण्याचे काम करते. पण जेव्हा किडनी निकामी होते, तेव्हा शरीरात अनेक बदल घडतात.
Signs of kidney failure in legs
Signs of kidney failure in legssaam tv
Published On
Summary
  • चुकीच्या जीवनशैलीमुळे किडनीवर परिणाम होतो.

  • चेहऱ्यावरील सूज हा किडनी समस्येचा संकेत आहे.

  • पायांची सूज किडनीच्या अपयशाचे लक्षण असू शकते.

गेल्या काही वर्षांत भारतात किडनीच्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतायत. चुकीची लाईस्टाईल, अयोग्य आहार यांच्यामुळे या आजारात वाढ होताना दिसतेय. पॅकेज्ड किंवा प्रोसेस्ड अन्नाचे जास्त सेवन, पुरेसे पाणी न पिणे, जीवनशैली, चहा-कॉफीचे अति सेवन, सतत एकाच जागी बसून काम करणं अशा अनेक सवयींचा थेट परिणाम किडनीवर होत आहे.

ज्यावेळी आपल्याला कोणतीही समस्या होणार असेल तेव्हा शरीर काही ना काही संकेत देत असतं. त्याचप्रमाणे किडनी बिघडण्यापूर्वी शरीर काही संकेत देतं. हे संकेत वेळेत ओळखलं तर किडनीचे नुकसान टाळता येऊ शकते.

किडनी शरीरातील फिल्टरसारखे काम करते. जेव्हा किडनी नीट कार्य करत नाही, तेव्हा शरीरातील घातक घटक म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर निघत नाहीत आणि शरीरातच साचू लागतात. शरीरात टॉक्सिन्स जमा झाल्यास चेहऱ्यावर सूज येऊ शकते. कोणताही संसर्ग किंवा इतर कारण नसताना चेहऱ्यावर सूज दिसत असल्यास ते दुर्लक्षित करू नका.

Signs of kidney failure in legs
Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

पाय सुजणं

अचानक आणि कोणतेही कारण नसताना पाय सुजणं हा देखील किडनी खराब होण्याचा मोठा इशारा असू शकतो. पाय सुजल्यावर घरगुती उपाय करण्याऐवजी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Signs of kidney failure in legs
Uncontrolled diabetes symptoms: शरीरात 'हे' बदल दिसले तर समजा डायबेटीज नियंत्रणाबाहेर गेलाय; लक्षणं ओळखून त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या

लघवीत फेस दिसणं

सलग अनेक दिवस लघवीत फेस दिसत असल्यास ते किडनीच्या समस्येचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष केल्यास स्थिती गंभीर होऊ शकते.

लघवीतून रक्त

लघवीत रक्त येणे ही अतिशय गंभीर लक्षण आहे. हे किडनी बिघडल्याचे मोठे चिन्ह मानले जाते, त्यामुळे अशा वेळी तातडीने वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे.

Signs of kidney failure in legs
Kidney stone symptoms: 'ही' लक्षणं दिसत असतील समजा किडनीमध्ये झालेत स्टोन; शरीरातील बदल ओळखून वेळीच उपचार करा
Q

किडनी आजारांची वाढ कशामुळे होत आहे?

A

चुकीचा आहार, प्रोसेस्ड अन्न आणि अनियमित जीवनशैलीमुळे किडनी आजार वाढत आहेत.

Q

चेहऱ्यावर सूज येण्याचे कारण काय असू शकते?

A

किडनीच्या कार्यात अडथळा येऊन टॉक्सिन्स जमा होण्यामुळे चेहऱ्यावर सूज येते.

Q

पाय सुजणे कोणत्या आरोग्य समस्येचे लक्षण आहे?

A

अचानक पाय सुजणे किडनीच्या कार्यात घसरणीचे गंभीर लक्षण आहे.

Q

लघवीत फेस दिसण्याचे अर्थ काय?

A

लघवीत फेस दिसणे प्रोटीनच्या निसर्गामुळे किडनी समस्येचे सूचन आहे.

Q

लघवीत रक्त आल्यास काय करावे?

A

लघवीत रक्त आल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com