Actress Accident: 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या कारला भीषण अपघात, बसनं दिली धडक

Shilpa Shirodkar Car Accident : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या कारचा अपघात झाला आहे. बसने गाडीला धडक दिली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात.
Shilpa Shirodkar Car Accident
Actress AccidentSAAM TV
Published On
Summary

शिल्पा शिरोडकरच्या गाडीचा अपघात झाला आहे.

शिल्पा शिरोडकर 'बिग बॉस 18'मध्ये झळकली होती.

अभिनेत्रीच्या गाडीला बसने जोरदार धडक दिली आहे.

'बिग बॉस 18' फेम अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या (Shilpa Shirodkar) गाडीचा अपघात झाला आहे. याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. शिल्पा शिरोडकरला 'बिग बॉस 18' मुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. तिचा 'बिग बॉस' मधील गेम चाहत्यांना खूप आवडला होता.

शिल्पा शिरोडकरने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गाडीचा अपघात झाला आहे. शिल्पा शिरोडकरच्या गाडीला एका बसने धडक दिली आहे. शिल्पाच्या लग्जरी कारला ठाण्यातील एका नामांकित कंपनीच्या बसने धडक दिल्याने मोठा अपघात झाला. याबद्दल शिल्पाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिल्पा शिरोडकरच्या गाडीला सिटीफ्लोची एक (Cityflo) बस धडकली. शिल्पाने सिटीफ्लो कंपनीच्या मुंबईतील ऑफिसला फोन केला. तेव्हा त्यांनी जबाबदारी झटकली. जे काही घडले त्यात ड्रायव्हरची जबाबदारी असल्याचे कंपनीचे अधिकारी म्हणाले.

शिल्पा शिरोडकरने पोस्टमधून तक्रार नोंदवल्या बद्दल आभार मानले आहेत. तसेच सिटी फ्लो कंपनीने जबाबदारी नाकारल्याने कंपनीने मला संपर्क केला तर बरं होईल, असे ती म्हणाली आहे. झालेल्या अपघातात शिल्पा शिरोडकर आणि तिच्या स्टाफला कोणतीही दुखापत झाली नाही आहे. शिल्पा शिरोडकरने अपघाताचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात गाडीचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. गाडीच्या मागील बाजूची काच फुटली आहे.

वर्कफ्रंट

'बिग बॉस 18' नंतर शिल्पा शिरोडकरला खूप लोकप्रियता मिळाली आहे. शिल्पा शिरोडकर लवकरच 'जटाधरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिल्पा शिरोडकर चित्रपटात सोनाक्षी सिन्हासोबत झळकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'जटाधरा' चित्रपट 19 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. चाहते तिच्या आगामी प्रोजोक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Shilpa Shirodkar Car Accident
War 2 VS Coolie : हृतिक रोशन अन् रजनीकांत यांच्यात कांटे की टक्कर, पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com