फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी अनेक चित्रपट करूनही बॉलिवूडमध्ये ते फ्लॉप ठरले आहेत. मात्र आज त्यांची कोट्यवधींची संपत्ती आहे. बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्रीने सलमान खान, शाहरुख खान यांच्या सारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. तरीही अभिनय क्षेत्रात त्यांना यश आले नाही. अशी एक अभिनेत्री जरी बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरली असली तरी खऱ्या आयुष्यात ती सुपरहिट आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मिस इंडियाचा किताब जिंकणारी नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar ) आहे.
नम्रता शिरोडकरने सलमान खान, संजय दत्त, अजय देवगण, अनिल कपूर यांच्या सारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. तिने तब्बल 6 वर्ष फिल्म इंडस्ट्रीत काम केले आहे. तसेच तिने या काळात अनेक चित्रपट देखील केले आहेत. आज नम्रता शिरोडकरचा वाढदिवस आहे. आज नम्रता शिरोडकर 53 वर्षांची झाली आहे. तिच्या चित्रपटाच्या कारकिर्दीत फक्त 2-3 चित्रपट हिट ठरले आहेत.
नम्रता शिरोडकरचा मुंबईत 22 जानेवारी 1972 ला जन्म झाला. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली. नम्रता शिरोडकरला 1993 मध्ये तिने वयाच्या 21 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब मिळाला. मिस इंडिया झाल्यानंतर नम्रताने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. मीडिया रिपोर्टनुसार, 1977 मध्ये 'शिर्डी के साई बाबा' या चित्रपटात बाल कलाकाराच्या भूमिकेत ती दिसली.
'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटातून तिने 1998 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने सलमान खान आणि ट्विंकल खन्नासोबत काम केले. नम्रता शिरोडकरने हिंदीसोबतच साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र तिथेही तिला यश मिळाले नाही. नम्रताने कच्चे धागे, पुकार, हेरा फेरी, अस्तित्व, दिल विल प्यार व्यार अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
नम्रता शिरोडकरने 2005 मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्नगाठ बांधली. नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांची पहिली भेट तेलुगू चित्रपट 'वामसी'च्या शूटिंगदरम्यान झाली होती. या चित्रपटातून त्यांची पहिली मैत्री आणि नंतर त्यांचे प्रेम जुळले. या दोघांनी एकमेकांना 5 वर्षे डेट केल्यानंतर लग्न केले. नम्रता-महेश यांना दोन मुलं आहेत. मुलाचे नाव गौतम आणि मुलीचे नाव सितारा आहे.
नम्रता शिरोडकरने जरी फ्लॉप चित्रपट केले असले तरी ती कोट्यवधींची मालकीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नम्रता शिरोडकर हिची एकूण संपत्ती तब्बल 50 कोटी रुपये आहे. हैदराबादमध्ये तिचा एक आलिशान बंगला आहे. ज्यामध्ये ती पती आणि मुलांसोबत राहते. याशिवाय तिच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. नम्रता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्राम 5.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती आपल्या नवनवीन लूकचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.