Saif Ali Khan: सैफला मिळाला डिस्चार्ज, अखेर ६ दिवसांनी परतला घरी

Saif Ali Khan Discharge: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला अखेर डिस्चार्ज मिळाला आहे. त्याच्या प्रकृतीचे हेल्थ अपडेट जाणून घ्या.
Saif Ali Khan Discharge
Saif Ali KhanSAAM TV
Published On

बॉलिवूडचा फायटर अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. सैफच्या मुंबईत वांद्रे येथे असलेल्या घरात त्याच्यावर चोराने चाकूने हल्ला केला. ही घटना 16 जानेवारीला घडली. चोरासोबत झालेल्या झटापटीत सैफ अली खान खूप गंभीर झाला आणि त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

चाकू हल्ल्यानंतर अखेर ६ दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला आता लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता सैफ अली खान नवीन इमारतीत शिफ्ट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयातून आता सैफ फॉर्च्युन हाइट्स या इमारतीत राहायला जाणार आहे.

हल्ल्यामध्ये सैफवर चाकूने वार करण्यात आले. शस्त्रक्रियेत सैफच्या शरीरातून चाकूचा तुकडा काढण्यात आला. त्यानंतर प्रकृती चांगली होईपर्यंत त्याला आयसीयूमध्ये स्पेशल रुममध्ये शिफ्ट करण्यात आले. रक्तबंबाळ सैफला इब्राहिम रिक्षातून लिलावती रुग्णालयात घेऊन गेला होता. गुरुवारी मध्यरात्री सैफ अली खानच्या घरी चोर घुसला होता. सैफवर चोराने ६ चाकूचे वार केले. सैफच्या शस्त्रक्रियेत दरम्यान त्याच्या मणक्यात अडकलेल्या चाकूचा एक भाग काढण्यात आला.

Saif Ali Khan Discharge
Saif Ali Khan: फायटर सैफ अली खान आज घरी परतणार, वाचा हेल्थ अपडेट

सैफवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद इलियास शरीफुल इस्लाम शहजादला अटक करण्यात आली आहे. सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबियांचे,नोकरांचे जबाब नोंदवले आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा 30 वर्षांचा असून तो बांग्लादेशाचा नागरिक आहे. तसेच तो एक कुस्तीपटू देखील आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

Saif Ali Khan Discharge
Saif Ali Khan Attack Update : ...तर सैफ अली खानवर हल्ला झालाच नसता! त्या रात्री घरात नेमकं काय घडलं? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com