
Saif Ali Khan Attack Update : सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला झाला. सैफवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद इलियास शरीफुल इस्लाम शहजादला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या हल्ला प्रकरणाबद्दलची नवी माहिती समोर आली आहे. यानुसार, जेव्हा सैफवर हल्ला झाला तेव्हा त्याच्या घरात वरच्या मजल्यावर चार पुरुष नोकर होते. हल्लेखोराने घरात प्रवेश केल्यानंतर या चारही नोकरांनी सैफला मदत केली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी सैफ अली खानच्या घरात चार पुरुष नोकर हजर होते. हल्लेखोराने हल्ला केला तेव्हा घरातील महिला कामगारांनी आरडाओरड केली. ओरडण्याच्या आवाजाने पुरुष नोकर घाबरले. त्यातील एक नोकर तर घरातच लपून बसला. त्यांनी जर वेळीच हल्लेखोराचा प्रतिकार केला असता, तर सैफ अली खानवर हल्ला झाला नसता असे म्हटले जात आहे.
हल्ला होत असताना सैफच्या मदतीसाठी पुरुष नोकर धावून आले नाही. बाहेरुन आलेल्या महिला नोकरांनी आरोपीला खूप प्रयत्न करुन जेहच्या खोलीत कोंडून ठेवले. जेहच्या खोलीतून बाहेर पडून तो बाथरुममध्ये गेला. पुढे पाईप लाईन मार्गे तो दहाव्या मजल्यावर गेला आणि पायऱ्यांवरुन खाली उतरुन पसार झाला.
सैफच्या घरात घुसण्यासाठी आरोपीने शक्कल लढवली होती. तो इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन डक्ट पाईपच्या सहाय्याने अकराव्या मजल्यावर जेहच्या खोलीतील बाथरुममध्ये घुसला. बाथरुमला जाळी नसल्याने त्याचा मार्ग आणखी सोपा झाला. बाथरुममधून तो पुढे जेहच्या खोलीत शिरला. याच मार्गाने तो घराबाहेर पडला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.