Saif Ali Khan Case : संकटात मदतीचा दिला हात, आता बक्षीस मिळालं; सैफ अली खानला मदत करणाऱ्या रिक्षाचालकाला मिळाली इतकी रक्कम

Saif Ali Khan News Update : सैफ अली खानला संकटात मदत करणाऱ्या रिक्षाचालकाला बक्षीस मिळालं आहे. या रिक्षाचालकाला एका संस्थेने मदत देऊ केली आहे. तर सध्या सैफ अली खानवर हल्ला करणारा चोरटा पोलीस कोठडीत आहे.
saif ali khan
saif ali khan case Saam tv
Published On

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी रात्री हल्ला झाला होता. चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सैफ अली खान रिक्षाने प्रवास करत रुग्णालयात गेला होता. सैफवर हल्ला करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या संकटसमयी सैफच्या मदतीला रिक्षाचालक धावला होता. त्याच रिक्षाचालकाला बक्षीस मिळालं आहे.

saif ali khan
Saif Ali Khan Attack: ५ महिन्यापूर्वी मुंबईत आला, नावात बदल केला; सैफ हल्ला प्रकरणी बांगलादेश कनेक्शन, मुंबई पोलिसांची मोठी माहिती

भजन सिंह नावाच्या या रिक्षाचालकाने त्या घटनेबाबत मोठा खुलासा केला होता. त्याने म्हटलं की, त्या रात्री एका महिलेने रिक्षा थांबवली. यानंतर जखमी सैफला रुग्णालयात घेऊन गेलो. त्यांचासोबत एक युवक आणि लहान मुलगा होता. सैफ गंभीर जखमी झाला होता. ते सर्व एकमेकांसोबत कोणत्या रुग्णालयात जायचं, याविषयी चर्चा करत होते' दरम्यान, याच रिक्षाचालक भजन सिंहचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात त्याने अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयात पोहोचवल्यानंतर कोणतेही भाडे आकारले नसल्याचे सांगितले होते.

saif ali khan
Saif Ali Khan Stabbing Case: 'देवाची कृपा...'; सैफ-करीनाच्या फोटोसह शत्रुघ्न सिन्हांची ती पोस्ट व्हायरल, काय लिहिलंय?

रिक्षाचालकाला मिळालं बक्षीस

करीना कपूर आणि त्याच्या कुटुंबातील लोकांनी कोणताही संपर्क केला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संकटसमयी मदत करणाऱ्या रिक्षाचालकाला बक्षीस मिळालं आहे. खान किंवा कपूर कुटुंबीयांनी ही मदत दिली नाही, तर एका संस्थेने त्यांना मदत केली आहे. या संस्थेने ही मदत केली आहे. या संस्थेने रिक्षाचालकाने केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.

saif ali khan
Saif Ali Khan Attack Update : नेशनल पैलवान ते सैफचा हल्लेखोर; सैफ अली खान हल्लाप्रकरणात आरोपीचा धक्कादायक खुलासा

दरम्यान, सैफ अली खानला त्या रात्री रुग्णालयात पोहोचवण्याचे काम करणाऱ्या रिक्षाचालकाला ११ हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत. या रिक्षाचालकाने सैफला रुग्णालयात नेण्यात उशीर केला असता, तर त्याची प्रकृती आणखी बिघडली असती असे बोललं जात आहे. सैफच्या मणक्यात २.५ इंचाचा चाकू अडकला होता. त्याची वेळेत शस्त्रक्रिया झाली नसती तर त्याच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला असल्याचेही बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com