
अनेकांची बँकेत नोकरी करण्याची इच्छा असते. जर तुमचीही अशीच इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हीही बँकेत नोकरी करण्याची संधी शोधत असाल तर ही माहिती तुमच्या नक्की कामी येईल. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये एक नवीन भरती आहे.
IPPB ने वरिष्ठ व्यवस्थापक, DGM वित्त, महाव्यवस्थापक यासह विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी www.ippbonline.com या अधिकृत वेबसाइटवर १० जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये पात्र उमेदवार 30 जानेवारी 2025 पर्यंत फॉर्म भरू शकतात. अर्जाची लिंक शेवटच्या तारखेनंतर एक्टिव्ह राहणार नाही. त्यामुळे वेळ न घालवता अर्ज भरा.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक दूर संचार मंत्रालय आणि पोस्ट विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. ज्यामध्ये थेट वरिष्ठ स्तरावर नोकरी मिळण्याची ही उत्तम संधी आहे. बँकेने कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा सोडल्या आहेत याची माहिती खालीलप्रमाणे-
DGM- वित्त/CFO, महाव्यवस्थापक-वित्त/CFO- 01 जागा रिक्त
सहाय्यक महाव्यवस्थापक (कार्यक्रम/विक्रेता व्यवस्थापन)- 01 जागा रिक्त
वरिष्ठ व्यवस्थापक (उत्पादन आणि समाधान) - 02 जागा रिक्त
वरिष्ठ व्यवस्थापक (माहिती प्रणाली लेखा परीक्षक) - 01 जागा रिक्त
PPB च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी पदानुसार पात्रता नमूद करण्यात आली आहे. उमेदवारांकडे CA/B.E/B.Tech/MCA/पोस्ट ग्रॅज्युएट IT/Management/MBA/B.Sc/B.Tech/MSc इ. पदवी असणं आवश्यक आहे. याशिवाय पदानुसार कामाचा अनुभवही देण्यात आला आहे. उमेदवार अधिकृत भरती अधिसूचनेमधून तपशीलवार पात्रता संबंधित माहिती तपासू शकतात. डाऊनलोड करा- IPPB Recruitment 2025 Official Notification Download PDF
या भरतीमध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांचे किमान वय हे पदानुसार 26-38 असलं पाहिजे. त्याचप्रमाणे, कमाल वय देखील भिन्न आहे. वयोमर्यादा 1 जानेवारी 2025 रोजी आधारित असेल.
या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना स्केलनुसार रु. 2,25,937 ते रु 4,36,271/- प्रति महिना पगार दिला जाईल.
निवड प्रक्रिया पूर्णपणे मुलाखतीच्या आधारे होणार आहे. बँक मूल्यांकन, ग्रुप डिस्कशन आणि ऑनलाइन चाचण्या देखील आयोजित करू शकते.
IPPB च्या या रिक्त पदासाठी अर्ज करताना, SC/ST/PWD उमेदवारांना 150 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी ही फी 750 रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.