Raid 2 Box Office Collection instagram
मनोरंजन बातम्या

Raid 2 Box Office Collection : रितेश-अजयच्या 'रेड 2'नं अवघ्या तीन दिवसांत केलं बजेट वसूल

Raid 2 Box Office Collection Day 3 : 'रेड 2' चित्रपटाने तीन दिवसांत सिनेमाचे बजेट वसूल केले आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर 'रेड 2' चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे दोन सुपरस्टार पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अजय देवगणच्या (Ajay Devgan) अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. 'रेड 2' (Raid 2) चित्रपट 1 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बजेट वसूल केले आहे. चित्रपटाची तीन दिवसांची कमाई जाणून घेऊयात.

'रेड 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

  • दिवस पहिला - 19.25 कोटी

  • दिवस दुसरा - 12 कोटी

  • दिवस तिसरा - 18 कोटी

  • एकूण - 49.25 कोटी

रितेश देशमुखच्या 'रेड 2' चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 49.25 कोटींची कमाई करून चित्रपटाचे बजेट वसूल केले आहे. 'रेड 2'चे बजेट 48 कोटी रुपये आहे. 'रेड 2' चित्रपट राज कुमार गुप्ता दिग्दर्शित आहे. 'रेड 2'मध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे. तर रितेश देशमुखने खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'रेड 2' चित्रपटात अजय देवगण आणि रितेश देशमुखसोबत अजून देखील तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. यात वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक यांचा समावेश आहे.

'रेड 2' ओटीटी अपडेट

'रेड 2' हा चित्रपट 'रेड'चा सिक्वेल आहे. 'रेड' 2018 ला 'रेड' प्रदर्शित झाला होता. आता सात वर्षांनी 'रेड 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'रेड 2' हा ॲक्शन चित्रपट आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'रेड 2' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या सुरूवातीला चित्रपट ओटीटीवर येणार आहे. रविवारी 'रेड 2' किती कोटींची कमाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT