Sara Tendulkar: सचिनची लेक सारा करतेय बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याला डेट? नाव वाचून बसेल धक्का

Sara Tendulkar Dating Rumours : सारा तेंडुलकर पुन्हा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ती आता बॉलिवूडच्या अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
Sara Tendulkar Dating Rumours
Sara TendulkarSAAM TV
Published On

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar)कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. खूप काळापासून सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुबमन गिल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा पाहायला मिळत होती. मात्र आता यात एक मोठी ट्विस्ट आला आहे. आता सारा तेंडुलकरचे नाव बॉलिवूडच्या एका अभिनेत्यासोबत जोडले जात आहे. हा बॉलिवूडचा अभिनेता दीपिका पदुकोणसोबत रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाला होता.

सारा तेंडुलकर आता पुन्हा आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सारा तेंडुलकर आणि गहराइयांचा हिरो सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi)एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सारा आणि सिद्धांत एकत्र स्पॉट झाले. तेव्हापासून या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. मात्र अद्याप सारा तेंडुलकर आणि सिद्धांत चतुर्वेदीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सारा तेंडुलकर आणि सिद्धांत चतुर्वेदी हे चांगले मित्र आहेत. त्यांची केमिस्ट्री खूपच कमाल आहे. ते एकत्र खूपच छान दिसतात आणि आनंदी असतात. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात. भविष्यात यांचे नातं कोणते रुप घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सारा तेंडुलकर मॉडेलिंग आणि ब्रॅन्डच्या कामामध्ये कायम व्यस्त असताना पाहायला मिळते. आपल्या हटके लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती कायम इन्स्टाग्रामवर शेअर करत राहते.

सिद्धांत चतुर्वेदीला बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाते. 'गहराइयां' त्याने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत काम केले आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. चाहते आता सिद्धांत चतुर्वेदीच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Sara Tendulkar Dating Rumours
Sonyaa Ayodhya : 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीनं घेतला घटस्फोट, वयाच्या २९ वर्षी मोडला संसार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com