Parineeti Chopra And Raghav Chadha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti -Raghav Engagement: राघव- परिणीती चोप्राचा साखरपुडा लवकरच? तारीख ठरली, या दिवशी...

Parineeti Chopra And Raghav Chadha: परिणीतीच्या चाहत्यांना तिच्या लग्नाबाबत फारच उत्सुकता लागली आहे. अशामध्ये तिच्या साखरपुड्याची तारीख समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Parineeti – Raghav Engagement Date: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) हे दोघं त्यांच्या नात्यामुळे सध्या चर्चेमध्ये आहेत. दोघांनी अजूनपर्यंत आपल्या नात्याची अधिकृतपणे कबुली दिली नाही. पण दोघं लवकरच लग्न करणार असून त्यांच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरु असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. परिणीतीच्या चाहत्यांना तिच्या लग्नाबाबत फारच उत्सुकता लागली आहे. अशामध्ये तिच्या साखरपुड्याची तारीख समोर आली आहे.

परिणीती आणि राघव हे सध्या अनेक ठिकाणी एकत्र दिसत असले तरी देखील त्यांनी ते नात्यामध्ये असल्याचे कबूल केले नाही. दोघेही काही बोलत नसले तरी देखील सोशल मीडियावर त्याच्या जवळच्या काही लोकांनी केलेल्या ट्वीटमुळे ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे कन्फर्म झाले आहे.

नुकताच पंजाबी गायक आणि अभिनेता हार्डी संधूने त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला. तर आपचे खासदार संजीव अरोरा यांनी देखील ट्वीट करत राघव आणि परिणीतीला शुभेच्छा दिल्या आहेत. आता दोघांच्या नात्याबद्दल तर सर्वांना कळाले पण ते साखरपुडा कधी करणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आणि त्यांना या प्रश्नाचे उत्तर देखील मिळाले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'परिणीती आणि राघव या आठवड्यात म्हणजे 10 एप्रिलला साखरपुडा करू शकतात. परिणीती आणि राघव दिल्लीमध्ये छुप्या पद्धतीने साखरपुडा केल्यानंतर आपल्या नात्याची अधिकृत कबुली देऊ शकतात. परिणीती आणि राघवच्या साखरपुड्याला दोघांच्याही जवळचे काही मित्र आणि कुटुंबीयातील सदस्य सहभाही होतील.'

दरम्यान, परिणीती आणि राघव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी सुरु आहेत. कधी एअरपोर्टवर तर कधी हॉटेलवर एकत्र डिनर करताना दोघांना स्पॉट करण्यात आले. दोघांच्या या भेटीगाठीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरच ते नात्यामध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. पापाराझीच्या कॅमेऱ्याकडे पाहून परिणीती अनेकदा लाजताना दिसते. अशामध्ये जरी दोघांचं नातं आणि साखरपुड्याबद्दल बोलले जात असले तरी देखील राघव- परिणीती आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT