Salman Khan Death Threat Answer: ‘मी काहींची जान तर काहींचा...’ म्हणत भाईजानने मिळालेल्या धमकीवर मौन सोडलं...

सलमानने आता धमकी प्रकरणावर आपले मौन सोडले आहे.
Salman Khan Death Threat Answer
Salman Khan Death Threat AnswerTwitter
Published On

Salman Khan Death Threat Answer: बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या बराच चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी सलमानला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून (Rajasthan) ताब्यात घेण्यात आले होते. अशातच सलमानने आता धमकी प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. धमकी प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. धमकी मिळाल्यानंतर सलमानने थेट यापूर्वी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आताही त्याने धमकीबाबत थेट प्रतिक्रिया दिलेली नाही.

Salman Khan Death Threat Answer
Adipurush Poster: नेहमीच ट्रोल होणाऱ्या ‘आदिपुरुष’ चे पहिल्यांदाच कौतुक; हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर बजरंग बलीचे पोस्टर प्रदर्शित...

सलमानने बुधवारी एका पत्रकार परिषदेत सहभाग घेतला होता. यावेळी पत्रकार परिषदेत त्याला मिळणाऱ्या धमक्यांबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी सलमानला पत्रकारांनी तु अवघ्या देशाचा भाईजान आहेस. तर तुला मिळालेल्या धमक्यांकडे स्वत: कोणत्या नजरेने बघतो? यावेळी उत्तर देत सलमान म्हणतो, “मला जरी सर्व देश भाईजान नावाने हाक मारत असला तरी, मी सर्वांचाच भाई नाही. मी काहींचा भाई आहे, तर काहींची जान आहे. ” असे म्हणत त्याने मिळालेल्या धमकीवर आपले प्रत्युत्तर देणे टाळले आहे.

Salman Khan Death Threat Answer
Malaika Arora 2nd Wedding: ‘मला वेड लागले लग्नाचे...’; अर्जुन कपुरसोबतच्या लग्नाबाबत मलायकाने केला मोठा खुलासा

सलमानला रोहित गर्ग नावाच्या एका तरुणाने त्याच्या जवळच्या मित्राला ई-मेलच्या माध्यमातून धमकी पाठवली होती. सलमानच्या मित्राला मिळालेल्या ई-मेलमध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या अलीकडील मुलाखतीचा संदर्भ देण्यात आला आहे.

बिश्नोई त्या दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला होता की, “सलमान खानला मारणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे.” सलमान खानला धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

तसेच सलमान खानच्या वांद्र्यातील घराच्या बाहेरील पोलिस सुरक्षेत आणि त्याच्या खासगी सुरक्षेत केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षा देत कडेकोट सुरक्षा दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com