Adipurush Poster: नेहमीच ट्रोल होणाऱ्या ‘आदिपुरुष’ चे पहिल्यांदाच कौतुक; हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर बजरंग बलीचे पोस्टर प्रदर्शित...

Adipurush Poster Release On Hanuman Jayanti: हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर बजरंग बलीचा नवा पोस्टर प्रदर्शित केला आहे.
Adipurush Poster Release On Hanuman Jayanti
Adipurush Poster Release On Hanuman JayantiInstagram
Published On

Adipurush Hanuman Poster Release: ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चित्रपट कमालीचा सर्वत्र चर्चेत आहे. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावरुन देखील चित्रपटाची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्या पोस्टवरुन देखील सर्वत्र गदारोळ झाला होता. हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर बजरंग बलीचा नवा पोस्टर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात बजरंग बलीच्या भूमिकेत देवदत्त नागे आहे.

Adipurush Poster Release On Hanuman Jayanti
Malaika Arora 2nd Wedding: ‘मला वेड लागले लग्नाचे...’; अर्जुन कपुरसोबतच्या लग्नाबाबत मलायकाने केला मोठा खुलासा

रामनवमीनिमत्त पहिला पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर आता हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर बजरंग बलीच्या लूकचा पहिला पोस्टर प्रदर्शित केला आहे. ‘राम के भक्त और रामकथा के प्राण- जय पवनपुत्र हनुमान’ असं कॅप्शन देत देवदत्तने रामभक्तीत लीन असलेल्या पवनपुत्र हनुमानाचा पोस्टर शेअर केला आहे.

मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे याने चित्रपटात हनुमानाचे पात्र साकारले आहे. आदिपुरुषच्या पोस्टरवरून आजवर बरेच वाद झाले, मात्र पहिल्यांदाच नेटकऱ्यांकडून चित्रपटाच्या पोस्टरचे कौतुक होत आहे. चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमुळे हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह आणखीनच वाढवला आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपट येत्या १६ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी, रामनवमीला आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आले होते ज्यामध्ये प्रभास रामाच्या तर क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसली होती. भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करत असून ओम राऊत चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हिंदी व्यतिरिक्त प्रेक्षकांना हा चित्रपट तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही पाहता येणार आहे. यासोबतच चित्रपट IMAX आणि 3D व्हर्जनमध्येही प्रदर्शित होणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com