Bipasha Basu Baby Photo
Bipasha Basu Baby PhotoInstagram

Bipasha Basu Baby Photo: बिपाशाच्या लाडक्या लेकीची पहिली झलक; अभिनेत्रीने फोटो शेअर करताच फॅन्स म्हणाले, So Cute

नुकतंच बिपाशाने आपल्या लेकीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
Published on

Bipasha Basu Daughter Photo: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाडक्या लेकीचं स्वागत मोठ्या धुमधडाक्यात केलं. बिपाशाच्या मुलीचा चेहरा आपल्याला कधी पाहायला मिळणार हा प्रश्न सर्वच चाहत्यांना पडला होता. अखेर त्याचं उत्तर सर्वांना मिळालं असून नुकतंच तिने आपल्या लेकीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोशल मीडियावर बिपाशाच्या लाडक्या लेकीचा चेहरा पाहताच सर्वांच्याच आनंदाला पारावर उरलेला नाही.

Bipasha Basu Baby Photo
Salman Khan Death Threat Answer: ‘मी काहींची जान तर काहींचा...’ म्हणत भाईजानने मिळालेल्या धमकीवर मौन सोडलं...

बिपाशा बासूने काल रात्री अर्थात बुधवारी रात्री तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लाडक्या लेकीचे काही क्यूट फोटोज शेअर केले. या फोटोंमध्ये बिपाशाने आपल्या क्यूट मुलीला गुलाबी रंगाचा ड्रेस घातला असून त्यावर मॅचिंग हेअरबँड घातलेला दिसत आहे. हे फोटो शेअर करत बिपाशा बासूने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुझं या जगात स्वागत आहे.... माझी लाडकी देवी.”

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरची ही क्यूट मुलगी हुबेहुब तिच्या वडिलांसारखी दिसते. हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. दोघांच्याही चाहत्यांपासून ते इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी बिपाशाच्या क्यूट मुलीवर प्रेमाचा वर्षाव केला जात आहे.

हृतिक रोशनची पुर्वाश्रमीची पत्नी सुजैन खान हिने देखील देवीच्या फोटोवर कमेंट केली, ती म्हणते, “अगं किती सुंदर आहे. तिघांवरही नेहमीच प्रेम आहे... लव्ह यू डार्लिंग.” तर मलायका अरोरा म्हणते, “अरे व्वाह... तुझ्या पाठी सदैव देवाचे आशिर्वाद आहेत.” अभिनेत्री दिया मिर्झाच्या कमेंटनेही अनेकांचे लक्ष वेधले. ती म्हणते, “तुझ्या मागे सदैव आशिर्वाद आहेत... माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे... मला तुझ्या भेटीची खूपच आस लागली आहे.”

Bipasha Basu Baby Photo
Adipurush Poster: नेहमीच ट्रोल होणाऱ्या ‘आदिपुरुष’ चे पहिल्यांदाच कौतुक; हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर बजरंग बलीचे पोस्टर प्रदर्शित...

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरने २०१५ मध्ये आलेल्या ‘अलोन’ चित्रपटात त्या दोघांनी एकत्र काम केले होते. त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले होते. त्यानंतर त्या जोडीने २०१६ मध्ये या जोडप्याने लग्न केले. लग्नाच्या ६ वर्षांनंतर या जोडप्याने एका क्यूट मुलीला जन्म दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com