Manasvi Choudhary
आवळा खाणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. केसांसाठी घरगुती उपाय म्हणून तुम्ही आवळ्याचा उपयोग करू शकता.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड असते ज्यामुळे केस पांढरे होण्यापासून रोखले जाते.
आवळ्याचा रस प्यायल्याने केसांची वाढ झपाट्याने होते तुम्ही आवळ्याचा रस करून केसांच्या मुळांना देखील लावू शकता.
आवळ्याचा रस प्यायल्याने केस पांढरे होत नाही. आवळ्याच्या रसमध्यये अँटिऑक्सिडंट्स असते जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते.
आवळ्याच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे तुमचे केस जाड होतात आणि मजबूत देखील होतात.
आवळ्याचा रस बनवण्यासाठी आवळ्याचे छोटे तुकडे करून त्यातील बिया काढा. मिक्सरच्या भांड्यामध्ये आवळा, आले, आणि पाणी मिक्स घालून बारीक मिश्रण करा.
आता हे मिश्रण गाळणीने किंवा सुती कापडाने गाळून घ्या. त्यात उरलेले पाणी आणि काळं मीठ घालून मिक्स करा.