Surinder Shinda Passes Away Instagram
मनोरंजन बातम्या

Surinder Shinda Dies: प्रसिद्ध पंजाबी गायकाचे निधन, वयाच्या ६४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Surinder Shinda News: पंजाबचे प्रसिद्ध गायक सुरिंदर शिंदा यांचे निधन झाले आहे.

Chetan Bodke

Surinder Shinda Passes Away: संगीत क्षेत्रातून एक दुख:द बातमी येत आहे, पंजाबचे प्रसिद्ध गायक सुरिंदर शिंदा (Surinder Shinda) यांचे निधन झाले आहे. सुरिंदर शिंदा यांचे बुधवारी पहाटे लुधियानाच्या DMCH रुग्णालयात वयाच्या ६४ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. गायक सुरिंदर गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. गायक सुरिंदर यांच्या निधनामुळे पंजाबी संगीत क्षेत्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गायक सुरिंदर शिंदा यांना अनेक चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

गायक सुरिंदर यांना सर्वात आधी श्वसनाचा त्रास जास्त होत असल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांना पंजाबच्या डीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. ई- टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुरिंदर यांना एका आठवड्यापूर्वी रुग्णालयाच्या पल्मोनरी केअर वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यावेळी ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. बुधवारी सकाळी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सुरिंदर शिंदा हे पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध गायक होते. त्यांनी पंजाबी सिनेसृष्टीला अनेक हिट गाणी दिली आहेत. ‘पुत्त जट्टां दे’, ‘जट्टा जियोना मोर’, ‘काहर सिंह दी माउट’  ही पंजाबी हिट गाणी त्यांनी गायली आहेत. तसेच सुरिंदर शिंदा हे प्रसिद्ध पंजाबी गायक कुलदीप माणक यांचे सहकारी होते. त्यांनी दिवंगत अमरसिंह चमकिला यांना संगीतक्षेत्रात नाव कमावण्यास मदत केली होती. सुरिंदर शिंदा यांनी ‘ऊंचा दर बेब नानक दा’ आणि ‘पुत्त जट्टां दे’  यांसारख्या पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.

सुरिंदर शिंदा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती

सुरिंदर शिंदा यांचं खरं नाव सुरिंदर पाल धम्मी होते. सुरिंदर शिंदा यांचा जन्म २० मे १९५४ रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला. आपल्या भारदस्त आवाजाने सुरिंदर यांनी पंजाबी संगीत क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली. सुरिंदर शिंदा यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली. भगवंत मान आणि सुखबीर सिंह बादल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुरिंदर शिंदा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crying Benefits: रडणे आरोग्यासाठी चांगले; जाणून घ्या फायदे

Monsoon Hair Care: पावसात भिजल्यामुळे केसांमध्ये येणारी दुर्गंधी कशी टाळाल? वाचा घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: - सोलापुरात प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने भीकमांगो आंदोलन

शिंदे गटाला पश्चिम महाराष्ट्रात धक्का; माजी मंत्र्यांच्या बंधूंचा तडकाफडकी राजीनामा; पत्रात सांगितली मनातली खदखद

Home Vastu Tips: घराच्या पायऱ्यांखाली कोणत्या वस्तू ठेवू नयेत? त्रास होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT