Oppenheimer Movie: ‘बाहेरच्या लोकांनी आपल्या धार्मिकतेचा...’ Oppenheimer मधील दृश्यांवर फँड्रीतली ‘शालू’ संतापली

Rajeshwari Kharat Social Media Post: ‘ओपेनहायमर’ चित्रपटावर ‘फँड्री’ मधील शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरातने एक फेसबुक पोस्ट केलीय.
Rajeshwari Kharat on Oppenheimer Movie
Rajeshwari Kharat on Oppenheimer MovieSaam Tv
Published On

Rajeshwari Kharat Criticize Oppenhimer Movie:

सध्या भारतात बॉक्स ऑफिसवर एका हॉलिवूड चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ने अवघ्या काही दिवसातच कोट्यवधींची कमाई केली आहे.

चित्रपटाच्या तिकिटाचे दर जरी जास्त असले तरी, प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी एकच गर्दी करत आहे. एकीकडे प्रेक्षक नोलन यांचा चित्रपट असल्यामुळे एकच गर्दी करत आहेत तर, दुसरीकडे भारतीय प्रेक्षक चित्रपटातील काही दृश्यांवरुन नाराज आहेत.

सध्या भारतातील अनेक सेलिब्रिटींनी चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ‘ओपेनहायमर’ चित्रपटावर ‘फँड्री’ मधील शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरातने एक फेसबुक पोस्ट केलीय. सध्या अभिनेत्रीची ती पोस्ट कमालीची चर्चेत आली आहे.

Rajeshwari Kharat on Oppenheimer Movie
Jaya Bachchan Angry Video: ‘मी बहिरी नाही, मला व्यवस्थित...’ पापाराझींवर संतापल्या जया बच्चन; व्हिडीओ व्हायरल

ओपनहायमर चित्रपटाविषयी पोस्ट करत राजेश्वरी खरात फेसबूकच्या माध्यमातून म्हणते, “ “Oppenheimer” हिन्दू-मुस्लिम, धर्म, जात-पात, रंग इत्यादी विषयांमध्ये लोक एकत्रित येऊन दंगे मोर्चे आणि काय काय करतात, पण या गोष्टींमुळे आपण आपल्याच देशातील लोकांचा द्वेष करत आलोय. आज बाहेर देशातील काही लोकांनी आपल्या धार्मिकतेचा अपमान केला आहे, यावर कोणी जास्तं काही बोलेनात. सर्वांना विनंती आहे की या प्रकरणाचा तीव्र निषेध करा आणि या सिनेमाचा योग्य तो निर्णय लागावा ही जबाबदारी सरकारने लवकरात लवकर घ्यावी.” अशी पोस्ट अभिनेत्रीने केली.

अणुबॉम्बचे जनक वैज्ञानिक रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनपटात भगवद्गीतेचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये पहिला उल्लेख अणुबॉम्ब चाचणीनंतर, वैज्ञानिकाने आपल्या भाषणात गीतेच्या श्लोकाबद्दल सांगितले. तर दुसरा उल्लेख चित्रपटात एका इंटिमेट सीनदरम्यान नायिकेच्या हातात भगवद्गीता असून नायक तिला भगवतगीतेतील श्लोक वाचून दाखवतोय. चित्रपटातील दुसऱ्या सीनमुळे सोशल मीडियावर भारतीय प्रेक्षकांनी कमालीचा संताप व्यक्त केला.

Rajeshwari Kharat on Oppenheimer Movie
Adipurush OTT Release: बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला ‘आदिपुरूष’ ओटीटीवर पाहता येणार, कोणत्या प्लॅटफॉर्मवर कधी दिसणार?

नुकतंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर संताप व्यक्त करत म्हणाले की, 'असा सीन चित्रपटामध्ये दाखवलाच कसा गेला?' सोबतच याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते असेही सूत्रांनी दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.सोबतच अनुराग ठाकूर यांनी सेन्सॉर बोर्डाला तो सीन हटवण्याचेही आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com