Nick Jonas Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nick Jonas: प्रियांकाच्या पतीला मारण्याचा डाव? कॉन्सर्ट सुरु असतानाच निक जोनस पळत सुटला, व्हायरल व्हिडीओनं एकच चर्चा

Nick Jonas Viral Video: निक जोनस हा भाऊ केविन आणि जो जोनसोबत प्रागमध्ये परफॉर्म करत होता.या दरम्यानचा निकचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनस सध्या त्यांच्या कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. या कॉन्सर्टचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकतंच निक जोनस हा भाऊ केविन आणि जो जोनसोबत प्रागमध्ये परफॉर्म करत होता.या दरम्यानचा निकचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

नुकतंच प्रागमध्ये निक जोनस हा त्याचा भाऊ केविन आणि जो जोनसोबत शो परफॉर्म करताना दिसतोय दरम्यान निक जोनस अचानक धावत स्टेजवरून खाली उतरताना दिसतो आहे. बॉडीगार्डला नजर देत त्याने इशारा करत तेथून पळून जाताना दिसतो आहे. याचदरम्यानचा निक जोनसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निक जोनस धावत गेल्यानंतर त्याचा बॉडीगार्डही जातो. व्हिडीओ पाहून नेटकरी देखील चितेंत पडले आहेत. नेमका हा प्रकार काय आहे? असा प्रश्न त्यांनी केला आहे. तुम्ही पाहू शकता की व्हिडीओमध्ये, निक गात असताना समोरील लेझर लाईट त्याचप्रमाणे पडते आहे. ही लेझर कधी त्याच्या डोक्यावर तर कधी त्याच्या शरीरावर पडताना दिसते आहे. यामुळे निक लेझर पाहून निघून गेला. यानंतर काही वेळात शो थांबवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

Pani puri masala recipe: घरीच बनवा पाणीपुरीच्या तिखट पाण्याचा सुका मसाला; एक चमचा पाण्यात घाला की काम झालंच

SCROLL FOR NEXT