Hema Malini: हेमा मालिनी@76, सौंदर्याची खाण, अभिनयाची क्वीन; वाचा ड्रीम गर्लचा प्रवास!

Hema Malini Birthday: लाखो दिलोंकी धडकन अशी ओळख असणाऱ्या हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आहे. याचनिमित्ताने त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया.
Hema Malini
Hema MaliniSaam Tv
Published On

हेमा मालिनी या मनोरंजनविश्वातील यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहे. ९० च्या दशकात हेमा मालिनी यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आजही प्रेक्षकांनी हेमा मालिनी यांच्या चित्रपटातील गाणी आठवत आहेत. लाखो दिलोंकी धडकन अशी ओळख असणाऱ्या हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आहे. याचनिमित्ताने त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया.

Hema Malini
Jahnavi Killekar: 'जरा सा झूम लूं मैं' गाण्यावर जान्हवीचा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्या नजारा घायाळ; पाहातच क्षणी पडेल भुरळ

हेमा मालिनी यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी तामिळनाडू येथील अम्मानकुडीमध्ये झाला. हेमा मालिनी यांनी जवळपास चार दशकांच्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या हृदयात आहेत, त्यामुळे त्यांना आजही बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हटले जाते.

हेमा मालिनी यांचे वडील व्हीएस आर चक्रवर्ती हे तमिळ चित्रपटांचे निर्माते होते. ट्रेन क्लासिकल डान्सर असलेल्या हेमा मालिनी यांना चित्रपटांमध्ये करिअर करायचे होते. उत्कृष्ट अभिनयाने आणि सौंदर्याने ओळखल्या जाणाऱ़्या हेमा मालिनी यांनी अवघ्या लहानपणीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 1968 मध्ये हेमा मालिनी यांनी 'सपनो का सौदागर' या चित्रपटातून आपला चित्रपट प्रवास सुरू केला. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी या चित्रपटात काम केले होते, या चित्रपटात त्या ज्येष्ठ अभिनेते राज कपूरसोबत दिसल्या होत्या. 1970 मध्ये हेमा मालिनी यांना 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटात देवानंदसोबत काम करण्याची संधी मिळाली, या चित्रपटाला खूप यश मिळाले होते.

हेमा मालिनी यांनी काही गंभीर पात्रे साकारून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आणि त्या समीक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री ठरल्या होत्या. हेमा यांनी 1975 मध्ये आलेल्या 'खुशबू' आणि 1979 मध्ये आलेल्या 'मीरा' या चित्रपटात त्यांच्या गंभीर अभिनयाने समीक्षकांना भुरळ घातली होती.हेमा मालिनी यांनी 1972 मध्ये आलेल्या 'सीता और गीता' चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली होती, हा चित्रपट त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. 1975 च्या 'शोले' या आयकॉनिक चित्रपटात हेमा यांनी 'बसंती' नावाच्या मुलीची भूमिका केली होती. ती भूमिका अजरामर झाली. त्यांच्या चित्रपटलतील या व्यक्तिरेखेला आणि या चित्रपटाला प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत. 1977 मध्ये तिच्यासोबत ड्रीमगर्ल हा चित्रपट बनला होता, ज्यामध्ये धर्मेंद्र तिच्यासोबत दिसले होते, तसेच हेमा हिंदी सिनेविश्वाची ड्रीमगर्ल बनली होती.

Hema Malini
Ankita Walawalkar: अंकिताने लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना दिली; कोकण हार्टेड गर्लने कारणही सांगितले, पाहा Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com