Jahnavi Killekar
Jahnavi KillekarSaam Tv

Jahnavi Killekar: 'जरा सा झूम लूं मैं' गाण्यावर जान्हवीचा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्या नजारा घायाळ; पाहातच क्षणी पडेल भुरळ

Jahnavi Killekar Dance Video: जान्हवीने बिग बॉसच्या घरात देखील तिच्या नृत्यशैलीने सर्वांच्याच नजरा वेधल्या होत्या. आता नुकतंच जान्हवीने तिचा नवीन गाण्यावरील डान्स व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Published on

बिग बॉस मराठी फेम जान्हवी किल्लेकर डान्समुळे चर्चेत आली आहे. जान्हवीने सोशल मीडियावरील तिच्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जान्हवीने बिग बॉसच्या घरात देखील तिच्या नृत्यशैलीने सर्वांच्याच नजरा वेधल्या होत्या. आता नुकतंच जान्हवीने तिचा नवीन गाण्यावरील डान्स व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 Jahnavi Killekar
Makrand Anaspure Movie: मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका; दिवाळीत होणार चित्रपट प्रदर्शित

बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची स्पर्धक जान्हवी किल्लेकर आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवसांपासून जान्हवीने प्रेक्षकांची पंसती मिळाली. टॉप-६ स्पर्धकांमध्ये जान्हवी होती. यानंतर महाअंतिम सोहळ्यात ९ लाख रूपये घेऊन जान्हवीने अर्ध्यांतच खेळ सोडला. अशातच आता बिग बॉस संपल्यानंतर जान्हवीची क्रेझ काही संपली नाही. सोशल मीडियावर जान्हवीने नुकताच डान्स व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत जान्हवीने मराठमोळ्या रूपात साडी परिधान केली आहे. सुंदर साडी नेसून जान्हवीने डान्स केला आहे. ‘जरा सा झूम लूं मैं’ गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे.

जान्हवीचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. जान्हवीच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी जान्हवीच्या नृत्याचं कौतुक केलं असून व्हिडीओवर तुफान लाईक्स येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com