Priya Bapat-Umesh Kamat SAAM TV
मनोरंजन बातम्या

Priya Bapat-Umesh Kamat : प्रिया-उमेश मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र, नवीन चित्रपटाचं पोस्टर पाहिलं का?

Priya-Umesh New Movie : मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे कपल प्रिया बापट आणि उमेश कामत आता लवकरच नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटाचे नाव जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठी मनोरंजनसृष्टीतील पावर कपल प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) कायम आपल्या कामासोबत वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी एक गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ही जोडी तब्बल 12 वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार आहे. प्रिया बापटने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी आपल्या नवीन चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. यांच्या नवीन चित्रपटाचे नाव 'बिन लग्नाची गोष्ट' असे आहे. आता या चित्रपटातून प्रिया-उमेश कोणती गोष्टी उलगडणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रिया हाताची घडी घालून उभी आहे. तर उमेश हातात हार आणि डोक्याला मुंडावळ्या बांधून उभा असलेला दिसत आहे. पोस्टरधून दोघांच्याही भूमिका स्पष्ट होताना दिसत आहे.

'बिन लग्नाची गोष्ट' चित्रपटाच्या पोस्टरला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "नात्यातल्या गमतीची एक साधी सरळ गोष्ट! बिन लग्नाची गोष्ट" या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकार मंडळींकडून कमेंट्सचा, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते प्रिया बापट आणि उमेश कामत यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट विवाहसंस्था आणि वैवाहिक जीवन यावर भाष्य करणारा आहे. 'बिन लग्नाची गोष्ट' चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे आहेत. तर चित्रपटाची निर्माते नितीन वैद्य आहेत. या चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. प्रिया आणि उमेशसोबत चित्रपट मराठी कलाकार निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने झळकणार आहेत. 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट 12 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT