Priya-Umesh : प्रिया बापट अन् उमेश कामतने दिली गुड न्यूज, 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष

Priya Bapat-Umesh Kamat New Home : मराठमोळी जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधित एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Priya Bapat-Umesh Kamat New Home
Priya-UmeshSAAM TV
Published On

प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat ) हे प्रेक्षकांचे आवडते कपल आहे. ही दोघे कायम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. कायम ही दोघे एकमेकांना पाठिंबा देताना पाहायला मिळतात. आजवर यांनी अनेक हिट चित्रपट, मालिका आणि सीरिज यांमध्ये काम केले आहेत. यांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली. आता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या जोडीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. यासंबधित एक खास पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या नवीन घरात प्रवेश करून नवीन घराची पहिली झलक दाखवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रिया-उमेशच्या घराचे काम सुरू होते. प्रिया आणि उमेशने आपल्या नवीन घराच्या गृहप्रवेश पूजेचे फोटो इन्स्टाग्राम शेअर केले आहेत. काही दिवसांआधी प्रियाने एक व्हिडीओ शेअर करून नवीन घराची बातमी दिली होती. ती म्हणाली की,"आमच्या नवीन घरातील पहिला गुढीपाडवा" आणि आता तिने नवीन घराची पहिली झलक दाखवली आहे.

सध्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्यावर चाहते आणि कलाकारांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी पूजेसाठी पारंपरिक लूक केला होता. प्रियाने गुलाबी रंगाची छान साडी नेसली आहे. सोबत मॅचिंग ज्वेलरी परिधान केली आहे. तर उमेशने छान प्रिंटेड कुर्ता परिधान केला आहे. दोघे ही एकत्र खूपच छान दिसत आहे.

प्रिया आणि उमेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रिया बापट आणि उमेश कामत एकत्र नवीन घराच्या बाल्कनीमध्ये उभे राहिलेले पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये छान गुढी उभारलेली पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये प्रिया आणि उमेश पूजेला बसलेले पाहा पाहायला मिळत आहे.

Priya Bapat-Umesh Kamat New Home
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda : रश्मिका अन् विजयची लपूनछपून लंच डेट, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com