Ashok Ma. Ma : 'अशोक मा.मा.' मालिकेला नवं वळण, भैरवीचा होणार गृहप्रवेश

Ashok Ma. Ma Serial Update : 'अशोक मा.मा.' मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनिश आणि भैरवी लग्न करून घरी येणार आहेत.
Ashok Ma. Ma  Serial Update
Ashok Ma. Ma SAAM TV
Published On

'अशोक मा.मा' (Ashok Ma. Ma) ही मालिका अनेक वेळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत अनेक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. अशोक मामांनी नातवंडांचे टेन्शन घेतले आहे. त्यात आता भैरवी नावाचे नवे वादळ त्यांच्या आयुष्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. येणार रविवार मनोरंजनाचा महारविवार आहे. आता मालिकेत अनिश आणि भैरवी लग्न करू घरी आले आहेत.

सध्या 'अशोक मा.मा' मालिकेत बऱ्याच घटना घडत आहेत. अशोक मामा यांची नोकरीमध्ये सुरू असलेली धडपड, त्यात नातवंडांची जबाबदारी या सगळ्यात मामा मुलांना काही कमी पडू नये याची काळजी घेत आहेत. त्यात भैरवीचे नवे प्लान आणि कुरघोड्या सुरूच आहेत. आता त्यातच अनिश आणि भैरवीने अचानक लग्न केल्याने मामांना मोठा धक्का बसला आहे. भैरवीच्या हेतूंबद्दल आधीच त्यांच्या मनात संशय होता आणि आता या लग्नामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ashok Ma. Ma  Serial Update
Celebrity MasterChef: 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या सेटवर उषा नाडकर्णी लागल्या रडायला, नेमकं झालं तरी काय?

परशूरामने आधीच भैरवीविषयी संशय व्यक्त केला होता आणि त्याच्या संशयावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. फुलराणीने परशूराम आणि भैरवीचे फोटो काढून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले होते. त्याच वेळी संयमीने घरात खोटं बोलून विश्वासघात केल्याचंही उघड झालं. पण या सगळ्याचा कळस म्हणजे अनिशने भैरवीसोबत लग्न करून आल्याची बातमी असणारा आहे.

मामांनी आधीच घर विकण्याचा विचार सुरू केला होता आणि आता भैरवी घरात आली. तर परिस्थिती अजूनच बिघडण्याची शक्यता आहे. 'अशोक मा.मा' ही मालिकेचा विशेष भाग रविवारी दुपारी 2 वाजता आणि रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे.

Ashok Ma. Ma  Serial Update
Prathamesh Parab : दगडूनं दिल्या थेट थायलंडमधून 'मराठी भाषा गौरव दिनाच्या' शुभेच्छा, बायकोसोबत शेअर केला खास VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com