ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळीचा नवीन सिनेमा चिकी चिकी बुबूम बूम सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ताने एका इंटरव्ह्यूमध्ये आपल्या लग्नावर भाष्य केले आहे.
चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ता माळीने ‘सुमन म्युझिक मराठी’ या युट्यूब चॅनेलच्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
प्राजक्ता म्हणाली, मी लग्नासाठी तयार असून आईला मुल बघण्याची परवानगी दिली आहे.
प्राजक्ताने म्हटलं, परवानगी देताच, लग्नासाठी दोन मुलांनी पत्र पाठवत मागणी घातली.
यामध्ये एका शेतकरी मुलाचे देखील पत्र होते. यामध्ये त्याने लिहिले, मी शेतकरी आहे. मी शेतीच करणार आहे. जर तुम्हाला हे आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचे आहे.
हे पत्र प्राजक्ताला पत्र प्रचंड आवडले. ती म्हणाली, हे पत्र पाहून आता मी मुले बघण्यासाठी नकार दिलेला नाही.