ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अक्षया देवधर ही मराठी टेलिव्हजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती लक्ष्मीनिवास या मालिकेत भावना दळवीची भूमिका साकारत आहे.
२०११ मध्ये 'शाला' या मराठी चित्रपटातून अक्काची भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
अक्षयाने २०१६ साली तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले. यामध्ये तिने साकारलेली 'पाठक बाई' ची प्रेक्षकांना प्रचंड आवडले.
अक्षयाचा जन्म १४ मे १९९४ रोजी झाला. तिचे वय ३१ वर्षे आहे.
अक्षयाचे शिक्षण पुण्यात पूर्ण झाले. तिने बीएमसीसीमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
राणादा आणि पाठक बाई म्हणजेच हार्दिक आणि अक्षया यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी डिसेंबर २०२२ मध्ये पुण्यात लग्नगाठ बांधली.