Celebrity MasterChef: 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या सेटवर उषा नाडकर्णी लागल्या रडायला, नेमकं झालं तरी काय?

Usha Nadkarni Emotional : 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शोमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यांच्या रडण्यामागचे नेमकं कारण जाणून घेऊयात.
Usha Nadkarni Emotional
Celebrity MasterChefSAAM TV
Published On

सध्या सर्वत्र 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'ची (Celebrity MasterChef) चर्चा पाहायला मिळत आहे. रोज या शोमध्ये नवीन राडा होत आहे. सेलिब्रिटींची रेसिपी बनवण्यासाठी तारेवरची कसरत पाहायला मिळत आहे. रोज यांना नवीन टास्क देण्यात येतो. कधी टीमवर्क तर कधी एकट्याने स्वादिष्ट पदार्थ बनवावा लागतो. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे.

आता 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये पुन्हा एक राडा झाला आहे. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या नवीन प्रोमोमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni ) ढसाढसा रडताना पाहायला मिळत आहेत. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या नवीन टास्कमध्ये दोन-दोन स्पर्धकांच्या टीम करण्यात आल्या होत्या. यात फैजू-दिपिका कक्कर, उषा नाडकर्णी-राजीव अदातिया, कबिता सिंग-गौरव खन्ना आणि निक्की तांबोळी-तेजस्वी प्रकाश अशा जोड्या करण्यात आल्या होत्या.

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या नव्या टास्कमध्ये जोडीतील एका सदस्याला सायकल चालवायची होती तर दुसऱ्याला पदार्थ बनवायचा होता. या टास्कमध्ये गॅस हा सायकल चालवण्यावर अवलंबून होता. टास्कच्या दरम्यान उषा नाडकर्णी यांची सायकल चालवण्याची वेळ येते. मात्र त्या वयस्कर असल्यामुळे अर्चना गौतम त्यांना सायकल चालवण्यासाठी मदत करते. सायकल चालवता चालवता अर्चना थकते आणि सायकल चालवणे थांबवते.

दुसरीकडे राजीवचा पदार्थ तयार नसतो. त्यामुळे त्याला गॅसची गरज असते. तो अर्चनाला ओरडतो की सायकल चालव पण अर्चना ऐकत नाही. हे सर्व पाहून उषा नाडकर्णी खूप भावुक होतात आणि रडू लागतात. उषा ताईला रडताना पाहून अर्चना त्यांना मिठी मारते. पण उषा ताई त्यांना बाजूला जा बोलतात. आता या टास्कमध्ये कोण बाजी मारणार आणि कोणाचा 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा प्रवास थांबणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Usha Nadkarni Emotional
Chhaava Box Office Collection: महादेवाची कृपा! 'छावा'नं 'पुष्पा 2'ला पछाडलं, कलेक्शनचा आकडा किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com