'छावा' (Chhaava) 2025 मधील सर्वात मोठा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाने खूप कमी वेळात उंच भरारी घेतली आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) , तर महाराणी येसूबाईची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (Akshaye Khanna) झळकला आहे.
'छावा' पहिला दिवस 33.1 कोटी रुपये
दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये
तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये
चौथा दिवस - 24 कोटी रुपये
पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये
सहावा दिवस - 32 कोटी रुपये
सातवा दिवस - 21.5 कोटी रुपये
आठवा दिवस - 23 कोटी रुपये
नववा दिवस - 45 कोटी रुपये
दहावा दिवस - 40 कोटी रुपये
अकरावा दिवस - 19.10 कोटी रुपये
बारावा दिवस - 18.5 कोटी रुपये
तेरावा दिवस - 21.75 कोटी रुपये
एकूण कमाई - 385 कोटी रुपये
विकी कौशलचा 'छावा' चित्रपट आता लवकरच 400 कोटींचा टप्पा पार करणार आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 'छावा'ने तेराव्या दिवशी 'बाहुबली 2', 'पुष्पा 2', 'जवान' आणि 'स्त्री 2' ला मागे टाकले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2'नं तेराव्या दिवशी 18.5 कोटी, 'बाहुबली 2' नं तेराव्या दिवशी 17.25 कोटी रुपये, 'जवान'नं तेराव्या दिवशी 12.9 कोटी रुपये आणि 'स्त्री 2'नं तेराव्या दिवशी 11.75 कोटी रुपये कमावले होते. या सर्वांना मागे टाकत 'छावा'नं तेराव्या दिवशी 21.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'छावा'चे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. 'छावा' चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' विकीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'छावा' चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.