Chhaava Box Office Collection Day 11: 'छावा' आणि 'पुष्पा २' मध्ये काटें की टक्कर; ११ दिवसांत केलं इतक्या कोटींचं कलेक्शन

Chhaava Box Office Collection: विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. ११ व्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला हे जाऊन घेऊयात.
Chhaava box office collection
Chhaava box office collectionSaam Tv
Published On

Chhaava Box Office Collection: विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांचा ऐतिहासिक नाट्यमय चित्रपट 'छावा'ने बॉक्स ऑफिसवर आपला दमदार कामगिरी कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. या चित्रपटाने भारतात ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आणि पुष्पा २ आणि स्काय फोर्स सारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट संभाजी महाराजांच्या जीवनाभोवती आधारित आहे.

'छावा'ने ११ व्या दिवशी किती कोटी कमावले

सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, ११ व्या दिवशी म्हणजेच सोमवारी, छावाने सकाळ आणि दुपारच्या शोमध्ये एकत्रितपणे ७.२ कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर त्याचे एकूण कलेक्शन ३३३.९५ कोटी रुपये झाले आहे. 'छावा'ने दुसऱ्या आठवड्यात १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे, जो अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा २: द रुल' नंतर असा टप्पा गाठणारा एकमेव चित्रपट ठरला आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली.

Chhaava box office collection
PM Narendra Modi: लठ्ठपणाच्या मुद्द्यावर PM मोदी चिंतेत; 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींकडे मागितली मदत

'छावा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १: ३१ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २: ३७ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३: ४८.५ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४: २४ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ५: २५.२५ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ६: ३२ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ७: २१.५ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ८: २३.५ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ९: ४४ कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १०: ४० कोटी

छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ११: ७.२ कोटी

छावा एकूण कलेक्शन ३३३.९५ कोटी

Chhaava box office collection
Sridevi Death Anniversary: मुलीसाठी स्वतः मुलगा...; श्रीदेवीची 'ही' इच्छा राहिली अधुरी

छावाची कथा काय आहे?

'छावा' हा चित्रपट महान मराठा शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. दरम्यान, रश्मिका मंदान्ना त्यांची पत्नी येसूबाई भोसलेंची भूमिका साकारत आहे आणि अक्षय खन्ना औरंगजेबची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि विनीत कुमार सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com