Celebrity MasterChef: सुराल सिमर का फेम दीपिका कक्करने मध्येच सोडला 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शो; कारण ऐकून चाहते चिंतेत

Celebrity MasterChef Dipika Kakar: दीपिका कक्कर 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या शोद्वारे टीव्ही जगतात पुनरागमन केले आहे. मात्र, आता असे ऐकायला मिळत आहे की दीपिकाने हा शो सोडला आहे.
Celebrity MasterChef Dipika Kakar
Celebrity MasterChef Dipika KakarSaam Tv
Published On

Celebrity MasterChef: ससुराल सिमर का फेम अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या सेलिब्रिटी मास्टरशेफ या कुकिंग शोमध्ये काम करत आहे. ती ४ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतली आहे. त्यामुळे चाहते तिला पुन्हा पाहून खूप आनंदी आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अशी बातमी आहे की दीपिकाने शो मध्येच सोडला आहे. तिने शो का सोडला याचे कारण उघड झाले आहे.

म्हणूनच दीपिका कक्करने सेलिब्रिटी मास्टरशेफ शो सोडला

सेलिब्रिटी मास्टरशेफ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसणाऱ्या उषा नाडकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दीपिका कक्करने शो सोडल्याची पुष्टी केली. त्या म्हणाल्या, “तिची तब्येत ठीक नाही आणि तिच्या हातालाही दुखापत झालेली आहे. म्हणून तिने शो सोडला आहे. तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला होता आणि ती बरी झाली होती. पण तिला पुन्हा होऊ लागल्यामुळे तिला शो सोडावा लागला.

Celebrity MasterChef Dipika Kakar
'आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम ,महाराज, गडपती...'; 'शिवगर्जनेचा' अर्थ....तुम्हाला माहिती आहे का?

दरम्यान, दीपिकाचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने त्याच्या व्लॉगमध्ये सांगितले होते की, दीपिकाच्या हाताचे दुखणे जुने आहे आणि ते परत सुरु झाले आहे. डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Celebrity MasterChef Dipika Kakar
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींची नावं काय?

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' मध्ये आता कोण उरले आहे?

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' हा कार्यक्रम फराह खानने होस्ट केला आहे आणि चंदन प्रभाकर आणि अभिजीत सावंत यांना शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. शोमधून आऊट झालेला चंदन हा पहिला स्पर्धक होता. सध्या या शोमध्ये उषा नाडकर्णी, राजीव अदातिया, निक्की तांबोळी, कविता सिंग, तेजस्वी प्रकाश, फैसल शेख, गौरव खन्ना, अर्चना गौतम उरले आहेत. अलिकडेच अभिनेत्री आयशा झुल्का हिने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com