Shruti Vilas Kadam
छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी म्हणजे निंबाळकर घराण्यातील सईबाई भोसले. बालपणीच त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी विवाह झाला. राजे संभाजी यांचे पुत्र होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची द्वितीय पत्नी मोहिते घराण्यातील सोयराबाई भोसले होत्या. छत्रपती राजाराम राजे यांच्या त्या आई.
छत्रपती शिवाजी महाराजांची तिसरी पत्नी म्हणजे पालकर घराण्यातील पुतळाबाई भोसले.
छत्रपती शिवाजी महाराजांची चौथी पत्नी गायकवाड घराण्यातील सकवारबाई भोसले या होत्या.
शिर्के घराण्यातील सगुणाबाई भोसले या महाराजांच्या पाचव्या पत्नी.
जाधव घराण्यातील काशीबाई भोसले या महाराजांच्या सहाव्या पत्नी.
छत्रपती शिवाजी महाराजांची सातवी पत्नी विचारें घराण्यातील लक्ष्मीबाई भोसले होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांची आठवी आणि शेवटची पत्नी इंगळे घराण्यातील गुणवंताबाई भोसले या होत्या.