Aamir Khan-Gauri Spratt : गौरीसोबत माझं आधीच लग्न झालंय; आमिर खाननं सांगितली तिसऱ्या लग्नाची माहीत नसलेली गोष्ट

Aamir Khan-Gauri Spratt Relationship : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या पर्सनल लाइफमुळं प्रचंड चर्चेत आहे. सध्या गौरी स्प्राटला तो डेट करत आहे. आता आमिरनं गौरीसोबतच्या लग्नाबाबत 'मन की बात' सांगितली आहे. त्यामुळं चाहते आणि इंडस्ट्रीतील सर्वांनीच भुवया उंचावल्या आहेत.
आमिर खाननं दिली तिसऱ्या लग्नाची कबुली; म्हणाला, गौरी स्प्राटसोबत मनानं आधीच लग्न केलंय!
Aamir Khan-Gauri Spratt Relationshipsaam tv
Published On

Aamir Khan Third marriage with Gauri Spratt : प्यार किया नही जाता हो जाता है....दिल दिया नही जाता खो जाता है! अनिल कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ८० च्या दशकातील वो सात दिन या सिनेमातलं हे गाजलेलं प्रेमगीत. आमिर खानच्या आयुष्यातही असंच प्रेमाचं तुफान आलंया....त्याच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट इंडस्ट्रीत ऐकायला मिळतेय. आता तर त्यानं स्वतःच कबुलीच दिलीय. तिसऱ्या लग्नाबाबतची स्पेशल गोष्टही सांगितलीय. गौरी स्प्राटसोबत तो रिलेशनशिपमध्ये आहे आणि गौरीसोबत मनानं कधीच लग्न केलंय, असं त्यानं म्हटलंय.

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची जबरदस्त चर्चा मध्यंतरी सुरू होती. त्यावर एका शोमध्ये सलमान खाननं सॉलिड फिरकी घेतली होती. आमिरची गोष्टच वेगळी आहे. तो खूपच भारीये. तो परफेक्शनिस्ट आहे हे अख्ख्या जगाला माहीत आहे. पण जोपर्यंत तो लग्न परफेक्ट करत नाही, तोपर्यंत तो करतच राहील, असा चिमटाही सलमाननं काढला होता. सलमान खाननं नथीतून बाण मारला असला तरी, आमिर खाननंच तिसऱ्या लग्नाबाबतची वेगळीच गोष्ट जाहीरपणे सांगितली आहे. एका मुलाखतीत त्यानं गौरीसोबतच्या रिलेशनशिपबाबत कबुली दिली आहे. मी आधीच मनानं गौरीशी लग्न केलंय, असं तो म्हणाला.

गौरी स्प्राटबाबत काय म्हणाला आमिर खान?

परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या खासगी आयुष्यामुळं सॉलिड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच गौरी स्प्राटच्या हातात हात घालून तो पापाराझींच्या कॅमेऱ्यांसमोर आला होता. तेव्हापासून आमिर खान आणि गौरी हे दोघे एकत्रच दिसतात. गौरीसोबतच्या लग्नाची कबुलीच आता आमिरनं दिलीय.

आमिर खानचं पहिलं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. तिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. आता तिच्याशीही काडीमोड घेऊन आमिर गौरी स्प्राटला डेट करतोय. आम्ही दोघे सीरिअस रिलेशनशिपमध्ये आहोत, असं तो जाहीरपणे सांगतोय. रिलेशनशिपचं ठीक आहे आता तर एका मुलाखतीत त्यानं थेट लग्नाची गोष्ट केलीय.

इंडियन एक्स्प्रेसला आमिर खाननं नुकतीच मुलाखत दिली. मी आणि गौरी खूपच सीरियस आहोत. आम्ही कमिटेड स्पेसमध्ये आहोत. आम्ही पार्टनर आहोत हे सर्वांना माहीत आहे. मी माझ्या मनातून आधीच गौरीशी लग्न केलंय. मग औपचारिकता केली आणि नाही केली त्याने काय फरक पडणार आहे, असं आमिर खान बिनधास्तपणे म्हणाला.

आमिर खाननं याआधीही एका मुलाखतीत गौरीसोबत रिलेशनशिप आणि लग्नाबाबत जाहीरपणे सांगितलं होतं. गौरी स्प्राटसोबत लग्नाबाबत आमिरला विचारलं असता त्यानं फिंगर क्रॉस केलं होतं. मनातून तर कधीच लग्न झालंय, आता आमिर आणि गौरी स्प्राट प्रत्यक्षात लग्न कधी करतात, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागलीय.

आमिर खाननं दिली तिसऱ्या लग्नाची कबुली; म्हणाला, गौरी स्प्राटसोबत मनानं आधीच लग्न केलंय!
Aamir Khan : आमिर खाननं चाहत्यांना दिलं सरप्राइज; थेट गर्लफ्रेंडसोबत पोहचला थिएटरमध्ये, पाहा VIDEO

आमिर खानचा चित्रपटाचीही सुरुय चर्चा

आमिर खानच्या खासगी आयुष्याची जशी चर्चा सुरू आहे, तशीच त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाचीही चर्चा आहे. २० जूनला त्याचा सितारे जमीन पर हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झालाय. या चित्रपटात त्याच्यासोबत जेनेलिया डिझूजा ही प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय.

आमिर खाननं दिली तिसऱ्या लग्नाची कबुली; म्हणाला, गौरी स्प्राटसोबत मनानं आधीच लग्न केलंय!
Aamir khan: 'मला मराठी भाषा येत नाही, याची...'; आमिर खान असं का म्हणाला? पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com