Aamir Khan : आमिर खाननं चाहत्यांना दिलं सरप्राइज; थेट गर्लफ्रेंडसोबत पोहचला थिएटरमध्ये, पाहा VIDEO

Aamir Khan-Gauri Spratt Video : आमिर खानने चाहत्यांना थिएटरमध्ये जाऊन सरप्राइज दिले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्याच्यासोबत गर्लफ्रेंड गौरी देखील होती.
Aamir Khan-Gauri Spratt Video
Aamir KhanSAAM TV
Published On

आमिर खान 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात आमिर खानसोबत (Aamir Khan) जिनिलिया (Genelia) झळकली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे.

सध्या आमिर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आमिर खानने 'सितारे जमीन पर' चित्रपटाचा शो सुरू असताना थिएटरमध्ये अचानक जाणून प्रेक्षकांना सरप्राइज दिले आहे. यावेळी त्याच्यासोबत चित्रपटाची कास्ट आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी देखील होती. आमिरला पाहताच थिएटरमधील उत्साहाचा वातावरण निर्माण होते. सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करतात.

आमिरसोबत चित्रपटात काम केलेली मुलं देखील थिएटरमध्ये आली होती. त्यांनी प्रेक्षकांसोबत खूप मजा-मस्ती केली. आमिर खान प्रेक्षकांना विचारतो की, "तुम्हाला चित्रपट कसा वाटला?" प्रेक्षक चित्रपटाची खूप कौतुक करतात. प्रेक्षकांनी आमिर खानसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील काढले. आमिर खानच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

'सितारे जमीन पर' बॉक्स ऑफिस कलेक्शन

आमिर खान आणि जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' चित्रपट आता लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. या चित्रपटाने चार दिवसांत बंपर कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 66.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. भविष्यात चित्रपट किती कोटींचा व्यवसाय करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'सितारे जमीन पर' स्टारकास्ट

आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटात नवीन कलाकार पाहायला मिळत आहेत. यात अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा समावेश आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले.

Aamir Khan-Gauri Spratt Video
Amruta Khanvilkar : 'केदारनाथ'वरून परतल्यावर अमृता खानविलकरची तब्येत बिघडली, हाताला सलाईन लावून VIDEO केला शेअर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com