Aamir Khan: 'सितारे जमीन पर'च्या स्क्रिनिंगला आमिर खान अन् गर्लफ्रेंड गौरी एकत्र, हातात हात घातले, नेटकरी म्हणाले...

Aamir Khan Movie: आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट आज म्हणजेच २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अनेक बॉलिवूड स्टार्स चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला उपस्थित होते.
aamir khan and gauri spratt
aamir khan and gauri sprattSaam Tv
Published On

Aamir Khan: चाहते आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची ही प्रतीक्षा आज म्हणजेच २० जून रोजी पूर्ण झाली आहे. हा चित्रपट २० जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आमिर खानच्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विशेष प्रदर्शनात अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले. या विशेष प्रदर्शनात आमिर खान गर्लफ्रेंड गौरी स्प्राटसोबत दिसला.

आमिरने गौरीचा हात धरला

आमिर खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमिर खान गर्लफ्रेंड गौरी स्प्राटचा हात धरून पॅप्ससमोर पोज देताना दिसत आहे. गौरी आमिर खानसोबत उभी आहे, त्यानंतर आमिर खान त्याचा मुलगा आझाद हाक मारतो.

aamir khan and gauri spratt
Rajeshwari Kharat: 'दिग्दर्शकाने फोन केला की यायचंच...'; 'फँड्री' फेम राजेश्वरी खरात सोबत घडला कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रकार

गौरी स्प्राट साडी परिधान करताना दिसत आहे

व्हिडिओमध्ये आमिर खान जोधपुरी पांढऱ्या पारंपारिक सफारी सूटमध्ये दिसला. त्याच वेळी गौरी खान हिरव्या आणि सोनेरी रंगाची साडी परिधान करताना दिसली. आमिर खाननेही पॅप्ससमोर छान पोज दिली. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, 'आमिर सरांची या वयातही गर्लफ्रेंड आहे'.

aamir khan and gauri spratt
All Is Well Movie: 'फूल्ल टू मनोरंजन' करणारा 'ऑल इज वेल'; चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

दर्शिल सफारी स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचला

तारे जमीन परचा ईशान म्हणजेच दर्शिल सफारी देखील सितारे जमीन परच्या स्क्रिनिंगला पोहोचला. रितेश देशमुख त्याची पत्नी जेनेलियासोबत सितारे जमीन परच्या स्क्रिनिंगला पोहोचला. जेनेलिया पांढऱ्या रंगाच्या हेवी सीक्वेन्स साडीत दिसली. तर, रितेश डिझायनर कुर्ता सेटमध्ये आणि वर पारंपारिक जॅकेटमध्ये दिसला. अभिनेत्री तमन्ना आणि विकी कौशल देखील आमिर खानच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com