Housefull 5 Public Review: 'हाऊसफुल ५' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यूव

Housefull 5 Public Review: 6 जून 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या 'हाउसफुल 5' या बहुप्रतिक्षित चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Housefull 5 OTT Release Update
Housefull 5 OTT ReleaseSAAM TV
Published On

Housefull 5 Public Review: 6 जून 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या 'हाउसफुल 5' या बहुप्रतिक्षित चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, नाना पाटेकर, जॉनी लिव्हर यांसारख्या कलाकारांच्या उपस्थितीने सजलेल्या या चित्रपटाने थिएटरमध्ये हास्याचा महोत्सव घडवून आणला आहे.

चित्रपटाच्या कथानकात एका आलिशान क्रूझवर घडणाऱ्या रहस्यमय खुनाची चौकशी आणि त्यात निर्माण होणारे गोंधळ यांचा समावेश आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शक तरुण मंसुखानी यांनी या भागात दोन वेगवेगळे क्लायमॅक्स तयार केले आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना वेगवेगळ्या थिएटरमध्ये वेगवेगळे शेवट पाहायला मिळतात. या अभिनव प्रयोगामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Housefull 5 OTT Release Update
Deepika Padukone Exits Kalki 2: स्पिरिटनंतर 'कल्कि 2' मधूनही दीपिका पादुकोणची एक्सिट? या अटीमुळे सोडला चित्रपट...!

ट्विटरवर चाहत्यांनी चित्रपटाच्या विनोदी प्रसंगांचे कौतुक करताना लिहिले, 'पहिला पार्ट मस्त चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढत आहे.' एकाने लिहिले,'जॉनी लिव्हर, नाना पाटेकर आणि संजय दत्त यांच्या भूमिकांनीही प्रेक्षकांना हसवले आहे. चित्रपटाच्या संवादांमध्ये वापरलेले विनोदी पंचेस प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आहेत. पण, काही प्रेक्षकांनी थिएटर रिकामा असून पहिल्या दिवसाच्या पहिल्या शोला चांगला प्रतिसाद नसल्याचे देखील सांगितले आहे.

Housefull 5 OTT Release Update
Deepika Padukone Exits Kalki 2: स्पिरिटनंतर 'कल्कि 2' मधूनही दीपिका पादुकोणची एक्सिट? या अटीमुळे सोडला चित्रपट...!

'हाउसफुल 5'मुळे 'हाउसफुल' फ्रँचायझीच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवशी प्रतिसादामुळे चित्रपटाचे भविष्य आधारित आहे. माऊथ पब्लिसिटीचा या चित्रपटावर सकारात्मक परिणाम होणार कि हा चित्रपट उत्तम कामगिरी करु शकणार कि नाही हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com