Deepika Padukone Exits Kalki 2: स्पिरिटनंतर 'कल्कि 2' मधूनही दीपिका पादुकोणची एक्सिट? या अटीमुळे सोडला चित्रपट...!

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने 'कल्कि 2898 ए.डी.' या यशस्वी चित्रपटाच्या सिक्वेलमधून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Deepika Padukone Exits Kalki 2
Deepika Padukone Exits Kalki 2Saam Tv
Published On

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने 'कल्कि 2898 ए.डी.' या यशस्वी चित्रपटाच्या सिक्वेलमधून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाने कमी तास काम करणार असल्याची मागणी तिने केली होती, परंतु निर्मात्यांनी तिच्या या अटी मान्य न केल्यामुळे तिने प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दीपिका सध्या तिच्या मुली दुआच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करत आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की, ती आपल्या मुलीचे संगोपन स्वतः करणार असून, सध्या कामावर परतण्याची घाई करणार नाही.

Deepika Padukone Exits Kalki 2
Housefull 5 Box Office Collection: 'हाउसफुल 5'ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात;अक्षयच्या चार वर्षांतील चित्रपटांपेक्षा सर्वात मोठी ओपनिंग

'कल्कि 2898 ए.डी.' या चित्रपटात दीपिकाच्या सुमति या भूमिकेचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले होते. तिच्या अभिनयामुळे चित्रपटाला वेगळी उंची मिळाली होती. त्यामुळे, तिच्या एक्सिटमुळे 'कल्कि 2' च्या निर्मितीला अडथळा येण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी दीपिकाच्या भूमिकेचा काही भाग आधीच शूट केला आहे, परंतु दीपिका जर, खरंच चित्रपट सोडणार असेल तर, यानंतर हे पात्र कोण साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Deepika Padukone Exits Kalki 2
Big Boss 19: बिग बॉसच्या घरात लवकरच ७ अभिनेत्रीची एन्ट्री; होणार एंटरटेनमेंटचा डबल धमाका

'कल्कि 2898 ए.डी.' या चित्रपटात दीपिकासह अमिताभ बच्चन, प्रभास आदि कलाकरांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट कलयुगातील भगवान कल्कि यांच्या जन्माची कथा दाखवण्यात आली होती. 'कल्कि 2' पूर्वी दीपिकाने संदिप रेड्डी वांगा यांच्या स्पिरिट चित्रपटातूनही एक्सिट घेतली आहे. या एक्सिटमुळे दोघांमध्येही वाद निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com