Priya Bapat: 'कोस्ताओ'मध्ये प्रिया बापट झळकणार नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत; म्हणाली, 'या कारणांमुळे...'

Priya Bapat In Costao: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कोस्ताओ' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
Priya Bapat In Costao
Priya Bapat In CostaoSaam Tv
Published On

Priya Bapat In Costao: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कोस्ताओ' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीची भूमिका साकारली असून, या चित्रपटात सहभागी होण्यामागे नवाजुद्दीनसोबत काम करण्याची संधी हे मुख्य कारण असल्याचे तिने सांगितले.

प्रिया म्हणाली, "नवाज सरांसोबत काम करण्याची संधी मिळणे हेच 'कोस्ताओ' स्वीकारण्यामागील सर्वात मोठे कारण होते. मी त्यांच्या अभिनयाची आणि भूमिकांच्या निवडीची नेहमीच प्रशंसा केली आहे. त्यांच्या अभिनयातील प्रामाणिकपणा आणि समर्पण मला नेहमीच प्रेरणादायक वाटले आहे." या चित्रपटात 'मारिया' ही भूमिका साकारताना नवाजुद्दीन यांच्या अभिनयशैलीचा जवळून अभ्यास करण्याची संधी मिळाल्याचे तिने नमूद केले.

Priya Bapat In Costao
Apurva Makhija: आईला बलात्काराच्या धमक्या, सोशल मीडियाही बंद; 'इंडियाज गॉट लॅटेंट' वादामुळे अपूर्वा मखीजाच्या अडचणीत वाढ

'कोस्ताओ' चित्रपटात प्रिया बापटने साकारलेली 'मारिया' ही भूमिका भावनिकदृष्ट्या सशक्त आहे. या पात्राच्या माध्यमातून तिने आपल्या अभिनय कौशल्याचा नवा पैलू प्रेक्षकांसमोर मांडला आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे कथानकाला अधिक वास्तवता प्राप्त झाली आहे.

Priya Bapat In Costao
House Arrest: अश्लिलतेचा कळस; महिलांना कपडे काढायला लावले, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हाऊस अरेस्टचे सर्व एपिसोड डिलिट

चित्रपटाच्या दिग्दर्शिका सेजल मॅडम आणि संपूर्ण टीमचे आभार मानताना प्रिया म्हणाली, "या चित्रपटात सहभागी होणे ही माझ्यासाठी एक मोठी शिकवण होती. नवाज सरांसोबत काम करताना त्यांच्या अभिनयातील प्रामाणिकपणा अनुभवता आला, त्यामुळे माझ्या स्वतःच्या अभिनयातही सुधारणा झाली." 'कोस्ताओ' हा चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, त्यात प्रेम, त्याग आणि नात्यांतील संघर्ष यांसारख्या विषयांची मांडणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com