Latest Marathi Serial Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Premechi Goshta:"माझ्या नवऱ्यापासून लांब राहा नाहीतर...." मुक्ताने सावनीला खडसावलं

Premechi Goshta Serial Promo: 'प्रेमाची गोष्ट' या लोकप्रिय मालिकेमध्ये नविन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मुक्ताच्या मित्राचं नाव ऐकुन सागरचा जळफळात होताना पाहायला मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्टार प्रवाह वरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेनी अनेक प्रेक्षकांच्या मानामध्ये जागा निर्माण केली आहे. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमधील सागर आणि मुक्तीच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळत आहे. काही दिवसांपासून मालिकेमध्ये नविन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. गेल्या काही भागांमध्ये सागर आणि मुक्ताच्या प्रेमामध्ये सावनी मिठाचा खडा ताकताना दिसत आहे.

मागील महिन्यांच्या भागांमद्ये मिहिका आणि हर्षवर्धन यांचे लग्न झाले होते. त्यांच्या लग्नामुळे मिहिरच्या मनामध्ये मिहिकाबद्दल द्वेश निर्माण झाला आहे. तर सावनीनं कोळींच्या घरामध्ये एन्ट्री घेतली आहे. सावनीच्या वागणुकींमुळे घरातील सर्व सदस्यांना खसकर मुक्ताला खुप त्रास होताना दिसतोय. मात्र मुक्ता देखील तिच्या कुटुंबियातील लोकांसाठी खंबीरपणे अभी राहाताना दिसतेय.

कालच्या भागामध्ये सागरनी मुक्ता साठी रोमँटिक डेट प्लॅन केली होती. त्यांच्या बेडरुममध्ये मुक्तासाठी एक सुंदर साडी आणि पत्र ठेवलं होतं. मात्र ते पत्र सावनीच्या नजरेत आलं आणि तिनं सागरने मुक्तासाठी आणलेली साडी नेसली आणि घराच्या टेरेसवर गेली तिकडचे सर्व लाईट्स बंद असल्यामुळे सागरना ती मुक्ता वाटली. सागर मिठी मारणार तेवढ्यात तिथले लाईट्स ऑन झाले आणि सावनीला पाहुन सागर घाबरला. तेवढ्यात तिथे मुक्ता आली आणि तिने सावनीला चांगलंच सुनावलं. मुक्ता म्हणाली " माझी साडी नेसलीस मात्र माझा नवरा हिसकवून घेण्याचा विचार करू नोकोस."

मुक्तानी सावनीला चांगलाच धडा शिकवला त्यानंतर सावनीला तिथून निघुन जाण्यास सांगितले. त्यानंतर सागरची मसकरी करताना तिथे सई आणि आदित्य येतात आणि काय चाललंय? असं विचारतात त्यावर सागर म्हणतो "माझ्या मित्रांनी ही तयारी केली होती." त्यानंतर मिहिका आणि दर्शवर्धनमध्ये राडे पाहायला मिळतात. मिहिकाने हर्शवर्धनला धमकीचं दिली. नव्या प्रोमोमध्ये सावनी सईला धाबरवते आणि सागर सर्वांसाठी केक बनवतो. त्यातून थेडा केक मुक्ता तिच्या मित्रसाठी काडून ठेवायला लावते. सागरला प्रश्न पडतो की हा आशू नेमकं काण? आशू बद्दल कळल्यावर सागरची अवस्था कशी होणार हे पाहाणं रंजक ठरेल.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

SCROLL FOR NEXT