Premachi Goshta Serial : 'प्रेमाची गोष्ट' मध्या नवा ट्विस्ट; मिहिका मिहीच्या नात्यामध्ये सावनीची सावली?

Latest Marathi Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत प्रेक्षकांना पुन्हा एकदा नवा ट्विस्ट अनुभवायला मिळणार आहे. मालिकेच्या काही भागांपासून मुक्ता आणि सागरमधील दूरावा कमी होतेय. नुकतंच रिलीज झालेल्या प्रोमोमधील एका वाक्यामुळे "सावनी आणि मिहिर यांचं नेमकं नात काय?" असा प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालाय.
Latest Marathi Serial Update
Latest Marathi Serial UpdateCanva

'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या स्टार प्रवाहवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमध्ये मुक्ता आणि सागरची आगळी वेगळी लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या गेल्या काही भागांमध्ये अखेर मुक्ता आणि सागरमध्ये प्रेम खुलताना दिसत आहे. नुकत्याच रिलीज झालेला प्रोमो पाहता मालिकेला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. मालिकेमध्ये स्वातीच्या नवऱ्याचे सत्य समोर आल्यावर त्याच्यावर कठोर कारवाई होत असल्यमुळे स्वाती आणि इंद्रा मुक्ताचा तिरसकार करताना दिसत आहे. सुरुवाती पासूनच मुक्ता इंद्राला पसंत नव्हती पण बापूंचं मन राखण्यासाठी आणि सईजवळ राहाण्यासाठी इंद्राने मुक्ता सागरच्या लग्नाला होकार दिला होता.

Latest Marathi Serial Update
Anjali Arora Debut Bollywood : ‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोराचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; थेट सीतेची भूमिका साकारणार

आता मात्र मुक्तामुळे स्वातीचा नवरा कार्तिक विनयभंगाच्या आरोपाखाली जेलमध्ये गेल्यामुळे स्वाती कुठल्या न कुठल्या प्रसंगांमध्ये मुक्ताला त्रास कसा देता येईल असा प्रयत्न करत आहे. या मालिकेतील लव्ह बर्ड्स मिहीका आणि महिरमध्ये पुन्हा एकदा प्रेमाच्या लाटा पाहायला मिळत आहेत. ते दोघे परत एकत्र येताना गेल्या काही भागांमध्ये दिसले आहेत. मुक्ता आणि सागरला जवळ आणण्यासाठी प्रयत्न करताना एकमेकांबद्दल वाटणारे प्रेम व्यक्त करत असतात. काल झालेल्या भागामध्ये महिका मिहीरसाठी एक चिठ्ठी लिहिते. ती चिठ्ठी मिहिरला मिळते. तो चिठ्ठी वाचून टेबलावर ठेऊन निघून जातो. मग ती चिठ्ठी सागर आणि मुक्ताच्या हाती लागते आणि त्यांना गैरसमज होतो.

नवीन प्रोमोमध्ये, मिहिका, मिहिच्या लग्नाची बोलनी होत असते. तेव्हा अचानक सागरची पहिली बायको सावनी त्या कार्यक्रमामध्ये येऊन 'हे लग्न माझ्या उपस्थिती शिवाय कस होईल' असं म्हणत तिचं आणि मिहिरमधील नातं जाहीर करण्याची शक्यता आहे. आता या सगळ्यामुळे मिहिका आणि मिहीरमध्ये परत दूरावा निर्माण होणार की काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. त्यासोबतच सावनी आणि मिहिरमधील नेमकं नातं काय ? हे देखील आजच्या भागात स्पष्ट होईल.

Latest Marathi Serial Update
Saleel Kulkarni : "एकच चष्मा लावून सगळे चित्रपट किंवा माणसं बघता येत नाही"; सलील कुलकर्णीची ‘नाच गं घुमा’बद्दलची पोस्ट चर्चेत

प्रेमाच्या गोष्टीचा प्रवास

'प्रेमाची गोष्ट' ही मालिका 'ये है मोहब्बतें' या स्टार प्लस वरील हिंदी मालिकेचा रिमेक आहे. 'ये है मोहब्बतें' ही मालिका अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक मानली जाते. मालिकेमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांची लव्हकेमिस्ट्री दाखवणारी मालिका होती. ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर तब्बल ७ वर्ष प्रदर्शित होती. आता 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेला सुद्धा प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसतात.

Edited By: Nirmiti Rasal

Latest Marathi Serial Update
Gurucharan Singh : गुरूचरण सिंह बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी कुठे होता? वडिलांनी सांगितली सर्व घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com