Premachi Goshta Promo: सागरची होणार निर्दोष सुटका; कार्तिकला होणार अटक; प्रेमाची गोष्ट मालिकेचा नवा प्रोमो आऊट

Star Prvavah Serial Premachi Goshta Serial Promo: प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय आहे. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
Premachi Goshta Promo: सागरची होणार निर्दोष सुटका; कार्तिकला होणार अटक;  प्रेमाची गोष्ट मालिकेचा नवा प्रोमो आऊट
Premachi Goshta New Promo 6 June 2024Saam TV

प्रेमाची गोष्ट ही मराठी मालिकांमधील लोकप्रिय मालिका आहे. मालिका सध्या खूप वेगळ्या वळणावर सुरु आहे. मालिकेत सागरला अटक झाली आहे. त्यानंतर मुक्ता त्याला सोडवण्याचा खूप प्रयत्न करते. दरम्यान कार्तिक आणि सावनीमुळे सागर जेलमध्ये असल्याचे मुक्ताला समजते. आता मालिकेच्या येत्या भागात सागर निर्दोष सुटून तुरुंगाबाहेर येणार आहे. त्यासाठी स्वाती पोलिस स्टेशनमध्ये कबुली देणार आहे.

मालिकेत सागर तुरुंगात गेल्यापासून सर्वजण खूप टेन्शनमध्ये असल्याचे दिसत आहे. मुक्ता स्वातीला विनंती करुन तिला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यासाठी निघते. परंतु कार्तिक स्वातीला गायब करतो. यामुळे स्वातीला शोधावं की सागरला वाचवावं असा प्रश्न मुक्तासमोर उभा राहिलेला असतो. यामुळेच मिहीर या गुन्ह्यासाठी स्वतः जबाबदार असल्याचे पोलिस स्टेशनमध्ये सांगतो. त्यानंतर पोलिस मिहीरला जेलमध्ये टाकतात. परंतु आता मालिकेच्या येत्या भागात सागर आणि मिहीर दोघेही सुखरुप सुटून बाहेर येतात. मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

मालिकेच्या नव्या प्रोमोत स्वाती पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कार्तिकने हा गुन्हा केल्याची कबुली देते. मी कार्तिकच्या सांगण्यावरुन ती बॅग आमच्या घरात ठेवली होती, असं तिने सांगितलं. त्यानंतर पोलिस कार्तिकला अटक करतात. मिहीर जेलमधून बाहेर येतो. मिहीर जेलमधून बाहेर आल्याचा आनंद सावनीलादेखील झाला असतो. मात्र, हर्षवर्धनला हे फारसं आवडलेलं दिसत नाही. त्यानंतर एकीकडे मुक्ता सागरबद्दल प्रेमाने बोलताना दिसत आहे. सागर आणि मुक्तामध्ये प्रेम वाढताना दिसत आहे.

Premachi Goshta Promo: सागरची होणार निर्दोष सुटका; कार्तिकला होणार अटक;  प्रेमाची गोष्ट मालिकेचा नवा प्रोमो आऊट
Sonu Nigam Trolling : गायक सोनू निगम नेटकऱ्यांवर भडकला, अयोध्येवरील 'त्या' पोस्टवरून चांगलंच सुनावलं

मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रोमोत सागर जेलमधून बाहेर आल्याने प्रेक्षकांना खूप आनंद झाला आहे. तर आता मुक्ता आणि सागरमध्ये प्रेमाचं नातं फुलणार का? सागर मुक्ताच्या आयुष्यात सावनी कोणतं नवं वादळ घेऊन येणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.

Premachi Goshta Promo: सागरची होणार निर्दोष सुटका; कार्तिकला होणार अटक;  प्रेमाची गोष्ट मालिकेचा नवा प्रोमो आऊट
Pooja Sawant Dance: "दिसते मी भारी, राजा फोटो माझा काढ...", पूजाला पडली गुलाबी साडी गाण्याची भुरळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com