Pooja Sawant Dance: "दिसते मी भारी, राजा फोटो माझा काढ...", पूजाला पडली गुलाबी साडी गाण्याची भुरळ
सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) तिच्या सौंदर्याने नेहमीच लक्ष वेधून घेते. अभिनेत्री तिचे पारंपारिक आणि वेस्टर्न लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सध्या पूजाची गुलाबी साडीतील व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Entertainment News Marathi)
सोशल मीडियावर गुलाबी साडी हे गाणं (Song) सध्या तुफान वाजतंय. अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर मराठी साज करून रिल्स आणि व्हिडीओ बनवत आहे. अशातच अभिनेत्री पूजा सावंतला या गाण्याची भुरळ पडली आहे.
गुलाबी साडी आणि लाली लाल... या गाण्यावर ताल धरत पूजाने व्हिडीओ शेअर केला आहे. गाण्याच्या बोलप्रमाणे पूजाचं सौंदर्य उठून दिसतंय. "गुलाबी साडी नेसल्यावर कोणत्याही वेगळ्या गाण्यावर रील बनवणं बेकायदेशीर आहे", असं कॅप्शन तिने दिलं आहे. पूजाने या व्हिडीओमध्ये गुलाबी रंगाची पैठणी नेसली आहे. कपाळी चंद्रकोर, केसात गजरा आणि नाकात नथ पूजाचं मराठमोळं गुलाबी सौंदर्य फारच सुंदर दिसतंय.
पूजाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. पूजाचा मराठमोळा लूक तिच्या चाहत्यांना भावला आहे. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. "तू खुप सुंदर दिसत आहे" तर आणखी एकाने "लव्ह" अशी पूजाच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे.