प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' रिलीज
पहिल्याच दिवशी चित्रपट हाऊसफुल
स्नेहल तरडे आणि मोहन जोशी चित्रपटात मुख्य भूमिकेत
प्रवीण तरडेंचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'देऊळ बंद २' आज (२१ मे) ला चित्रपट गृहात प्रदर्शित झाला आहे. 'देऊळ बंद २' हा 'देऊळ बंद' चा सीक्वल आहे. या भागात शेतकरी देवाची परीक्षा घेताना दिसणार आहे. चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी हाऊसफुल पाहायला मिळत आहे. चित्रपटातून तुम्हाला स्वामींचे साक्षात दर्शन घडेल. 'देऊळ बंद -2'मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. तर महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत स्नेहल तरडे दिसल्या आहेत. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे.
'देऊळ बंद -2' चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे हा आहे. आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल करण्याची गरज आहे, असा ठाम संदेश या चित्रपटातून दिला गेला आहे. 'देऊळ बंद -2' चित्रपटाची कमाई शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केली. चित्रपटात स्वामी शेतकरी महिलेसोबत प्रवास करताना, तिच्याशी बोलताना, शेतात, दऱ्याखोऱ्यांमध्ये, एसटीने प्रवास करताना दिसत आहे.
'देऊळ बंद २' चा पहिला भाग 'देऊळ बंद' २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. 'देऊळ बंद' मध्ये मराठी अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता. तसेच या चित्रपटात प्रवीण तरडे, मोहन जोशी, गिरिजा जोशी, स्नेहल तरडे, सुनील अभ्यंकर, मोहन आगाशे, शर्वरी जमेनिस , महेश मांजरेकर आणि सुनील बर्वे असे अनेक कलाकार झळकले होते. 'देऊळ बंद' हा मराठीतील गाजलेला चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा डॉ. राघव शास्त्री या एका अहंकारी आणि नास्तिक 'नासा' (NASA) शास्त्रज्ञाभोवती गुंफलेली आहे. जो भारतात परत येतो. भारतात परतल्यावर त्याचा येथील श्रद्धा-संस्कृतीशी संघर्ष होतो आणि तो एका स्थानिक मंदिराला बंद पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, जेव्हा त्याची ही टोकाची नास्तिकता आणि दुराग्रह यांना आव्हान देण्यासाठी खुद्द देव (स्वामी समर्थ) मानवी रूपात अवतरतात, तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.
'देऊळ बंद -2' चित्रपटात प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, मोहन जोशी , महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर हे कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.